कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील गजानन पार्क या गृहनिर्माण संकुलाशेजारी असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहे. रहदारीचा अर्धा रस्ता व्यापलेल्या या ट्रान्सफॉर्मरमुळे अपघाताची व जीवितहानीची शक्यता आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी व कर्जत नगर परिषद या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संबंधित कार्यालयाविरोधात नागरिकांतून संतप्त …
Read More »सेवानिवृत्त शिक्षकांनी आनंदी जीवन जगावे -सी. पी. पाटील
पेण : प्रतिनिधी जगामध्ये पैसा हा सर्वस्वी नाही. पैसा हा जगण्यापुरता पाहिजे. घराच्या बाहेर पडून सेवा करा, दुसर्याला आनंद द्या. तुम्ही शेवटपर्यंत आनंदात रहाल, असे प्रतिपादन निवृत्त गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी पेण येथे केले. महाराष्ट्र सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा नुकतीच पेणमधील आगरी समाज सभागृहात संघटनेचे उरण …
Read More »देरसे आये दुरुस्त आये
कोरोनामुळे देशातील सर्वच क्षेत्राला झळ पोहचली. क्रीडाक्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. दोन वर्षे सर्व खेळांच्या स्पर्धा बंद होत्या. आता शासनाने निर्बंध उठवल्यामुळे खेळांच्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या आहेत. रायगडचा विचार केल्यास कबड्डी हा या जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या खेळाच्या स्पर्धा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. …
Read More »रायगडात तीन दिवस बार परमिट रूम राहणार बंद; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांचे आदेश
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हयातील सहा नगर पंचायतींच्या सार्वत्रिक तसेच काही ग्रामपंचातीच्या पोटनिवडणूकांसाठी मतदान होत आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 20 , 21 व 22 डिसेंबर असे तीन दिवस मद्यविक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी दारूची दुकाने तसेच बार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी …
Read More »विक्रांत पाटील यांनी गोविंद गार्डन सोसायटीसाठी बनविला काँक्रीट रॅम्प
पनवेल : वार्ताहर प्रभाग 18 मधील स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रीटीकरण होऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण आद्यपही या मार्गावरील दुतर्फा स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम झालेले नाही. त्यामुळे स्वामी नित्यानंद मार्गालगतच्या सोसायट्यांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याची उंची वाढल्यामुळे सोसायट्यांमध्ये जाणार्या रस्त्याला उतार जास्त प्रमाणात होता. त्यामुळे दुचाकी आणि छोट्या …
Read More »‘सीकेटी’च्या दोन एनसीसी कॅडेट्सची दिल्ली राजपथावरील संचलनासाठी निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, न्यू पनवेलच्या राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभागाचे सिनियर अंडर ऑफिसर अनुज धरमसिंह रणवा आणि सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी राजेंद्र धाडगे यांची दिल्ली येथे होणार्या प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात 10 लाखांहून अधिक चाचण्या पूर्ण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात राहण्यासाठी चाचण्यांवर नेहमीच भर दिला असून पालिकेने आतापर्यंत 10 लाखांहून अधिक चाचण्या महापालिका क्षेत्रात केल्या आहे. नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चाचण्यांसाठी सहकार्य करावे, तसेच कोरोनापासून संरक्षणासाठी लसींचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. कोरोनाच्या …
Read More »…तर भाजप आंदोलन करेल!; ओबीसी आरक्षणावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे टाळल्यामुळे ओबीसी समाजाचे आज पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारकडे कोणतीही सबब उरलेली नसून या सरकारने डेटा गोळा करण्यात अजूनही टाळाटाळ केली तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल, असा …
Read More »कळंबोली येथे मोफत नेत्रचिकित्सा व चष्मेवाटप शिबिर
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील भाजपच्या कार्यालयामध्ये भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मेवाटप शिबिर आयोजित केले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये 280 नागरिकांनी डोळे तपासणी करून घेतली. या शिबिराचे उद्घाटन कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी केले. शिबिराच्या सांगता समारंभाच्या वेळी …
Read More »खाजगी दवाखाने आणि पॅथॉलॉजी लॅब धारकांची बैठक
पनवेल : प्रतिनिधी साथरोगाबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जनरल प्रॅक्टिशनर आणि पॅथॉलॉजी लॅबची माहिती महापालिकेकडे असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जनरल प्रॅक्टिशनर आणि पॅथलॉजी लॅब असोशिएशनच्या प्रतिनिधींची बैठक डॉ. अरुणकुमार भगत, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या उपस्थितीत महापौर दालनात घेण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper