Breaking News

Ramprahar News Team

खालापूर डेल्टा प्लस मुक्त; एक रुग्ण बरा झाल्याने तणाव कमी

खालापूर : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस विषाणूने चिंता वाढवली असून, खालापूर तालुक्यातील नोंद झालेला डेल्टा प्लस रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. रायगडमध्ये नोंद झालेल्या दोन डेल्टा प्लस रुग्णांपैकी एक खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील होता. 13 वर्षीय मुलाला डेल्टा प्लसची लागण झाली होती. …

Read More »

पेणमध्ये मंगळवारी जनआशीर्वाद यात्रा; शेतकर्‍यांच्या समस्यांसह अनेक विषयांवर चर्चा

पेण : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी (दि. 17) पेणमध्ये येत असून, यानिमित्त आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी संवाद, नुकसानभरपाई, गणपती कारखानदारांचे प्रश्न, पीओपीवरील बंदी, ग्रामीण रस्ते या विषयांवर चर्चा होणार …

Read More »

नेरळच्या व्यापारी संकुलाचे भाडेकरू कोण?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने 2008 मध्ये नेरळ बाजारपेठमधील सर्व अतिक्रमणे उद्ध्वस्त केली होती. त्या वेळी सर्व 72 टपरीधारकांची बांधकामे उद्ध्वस्त करून नेरळ-माथेरान रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये या टपरीधारकांसाठी रायगड जिल्हा परिषदने नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू केले. आता त्या …

Read More »

मुंबईमध्ये डेल्टा प्लसचा पहिला बळी

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका 63 वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीतील एका 80 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे 13 जून रोजी मृत्यू …

Read More »

कोर्ट राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही; विधान परिषद सदस्य नियुक्तीबाबत हायकोर्टाचा निकाल

मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीचा पेच कायम राहणार अशी चिन्हे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने 19 जुलै रोजी राखून ठेवलेला आपला निकाल शुक्रवारी (दि. 13) जाहीर केला, मात्र त्यानंतरही परिस्थितीत सध्यातरी काहीएक फरक पडलेला नाही. संविधानाने दिलेल्या …

Read More »

भूमिपुत्रांच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल; केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कृती समितीला आश्वासन

नवी दिल्ली ः रामप्रहर वृत्तसेवा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 13) राजधानी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सोबत होते. या वेळी मंत्री सिंधिया यांनी केंद्र सरकार सदैव भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून …

Read More »

कर्नाळा बँक आर्थिक घोटाळा प्रकरण : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई ः प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा, भ्रष्टाचारप्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात गुरुवारी (दि. 12) आरोपपत्र दाखल केले. सध्या पाटील हे तळोजा जेलमध्ये आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी विवेक पाटील यांच्यासह बँकेचे तत्कालीन व विद्यमान संचालक …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा सोमवारपासून झंझावात; 16 ऑगस्टला ठाणे, 17 रोजी रायगड दौरा

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचा कारभार लोकाभिमुख असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील 16 ते 20 ऑगस्टदरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात झंझावाती जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. या यात्रेत जिल्हास्तरीय व स्थानिक नेतेही सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरण भाजपमय होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून …

Read More »

शिवरायांचे विचार आणि कार्य आजही देशाला प्रेरणादायी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत आहे. इतकेच नव्हे तर शिवरायांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 13) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित …

Read More »

अतिवृष्टीमुळे रायगडात चार हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान

अलिबाग ः प्रतिनिधी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील एक हजार गावांमधील चार हजार 64 हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात 21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा जास्त फटका महाड, पोलादपूर आणि …

Read More »