Breaking News

Ramprahar News Team

आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पेण : प्रतिनिधी भाजप आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस रविवारी (दि. 15) विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी अनेक मान्यवरांनी आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या. पेण नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील विश्वेश्वर मैदानात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. म्हाडा कॉलनी येथे आमराई …

Read More »

जनआशीर्वाद यात्रेसाठी अलिबाग नगरी सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मंगळवारी (दि. 17) अलिबागमधून प्रारंभ होत आहे. या जनआशीर्वाद यात्रेसाठी संपूर्ण आलिबाग शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या यात्रेसाठी अलिबाग शहर सज्ज झाले आहे. केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद …

Read More »

चांदेपट्टी गावावर दरड, भूस्खलनाची टांगती तलवार; पेण तहसीलदारांनी केली पाहणी

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावावर दरड व भूस्खलनाची टांगती तलवार असल्याने गावातील 70 कुटुंबातील सुमारे 400 ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, चांदेपट्टी गावाच्या डोंगरानजीक असलेल्या 10 घरांतील ग्रामस्थांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करणार असल्याची माहिती पेणच्या तहसीलदार डॉ अरुणा …

Read More »

कर्जतमध्ये रक्षा आपत्ती व्यवस्थापन सदस्यांचे कौतुक

कर्जत : बातमीदार येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या रेस्क्यू टीमने जुलै महिन्यातील महापुरात बजावलेल्या शोध व बचावकार्याची दखल घेऊन कर्जत नगर परिषद आणि पोलीस ठाण्याच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 15) या रेस्क्यू टीम सदस्यांचा सन्मान करण्यात आला. अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमध्ये मंडळाच्या रेस्क्यू टीम सदस्यांनी कर्जत तालुक्यातील व्यक्तींना …

Read More »

पाणीपुरवठा अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे

अलिबाग : प्रतिनिधी रेवस पाणीपुरवठा योजनेतील झोन 1 मध्ये समाविष्ट होणार्‍या कोप्रोली, मिळखतखार, सारळ, नवखार आणि रेवस या पाच ग्रामपंचायतींमधील गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण असह्य झाल्याने स्वातंत्र्य दिनी या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी रविवारी (दि. 15) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सर्व सरपंचांनी उपोषण …

Read More »

ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या सन्मानार्थ मोटरसायकल रॅली; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रियंका टीव्हीएस शोरूमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याच वेळी ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवून देणार्‍या खेळाडूंच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या एओजी मोटरसायकल रॅलीला झेंडा दाखवून रॅलीचा आरंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या …

Read More »

राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा शिवसैनिकांकडून समाचार

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका कामासंदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात ‘मरू द्या मुख्यमंत्री’ असे भरणे यांनी म्हटले, मात्र शिवसैनिकांचा रोष पाहता दत्तात्रेय भरणे यांनीदेखील तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. सोलापूर महानगरपालिकेतर्फे रविवारी माझी वसुंधरा अभियान …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्य दिनाची भेट; देशासाठी 100 लाख कोटींच्या योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान मोदींनी देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवून रविवारी अनेक घोषणा केल्या. यामध्ये देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. ‘प्रधानमंत्री गतिशक्ती योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी असणार आहे. लाखो लोकांना रोजगार देण्यासाठी ही योजना आणण्यात आली …

Read More »

जनआशीर्वाद यात्रा ः केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा उद्या रायगड, नवी मुंबईत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा, तसेच नवी मुंबईत दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद, त्याचबरोबर …

Read More »

राष्ट्रगीताच्या आवाहनाला देशवासीयांचा तुफान प्रतिसाद

नवी दिल्ली : भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. दरम्यान, केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगभरातून दीड कोटींहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. केंद्राच्या आवाहनाला लोकांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने सांगितले की, देशातील जनतेने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानाला उत्स्फूर्त …

Read More »