Breaking News

Ramprahar News Team

सिडकोतर्फे विविध 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध; सर्वसामान्यांसह विकासकांकरिता सुवर्णसंधी

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा  सिडको महामंडळातर्फे तीन स्वतंत्र योजनांतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील निवासी आणि निवासी तथा वाणिज्यिक वापराचे तब्बल 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांसह विकासक व बांधकाम व्यावसायिकांनाही यामुळे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर 203 भूखंडांपैकी पहिल्या योजनेंतर्गत खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल …

Read More »

फुंडे महाविद्यालयात तु. ह. वाजेकर जयंती साजरी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वीर तुकाराम हरी वाजेकर यांची 115वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाविद्यालयात व्याख्यानाचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. ओहोळ होते. उरण येथील ज्येष्ठ पत्रकार …

Read More »

भाजप आमदारांच्या निलंबनाचा अलिबागमध्येही तीव्र निषेध

अलिबाग ः प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी केलेल्या अन्यायकारक निलंबनाबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे निषेध करण्यात आला. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करणारे पत्र दिले. या वेळी सतीश लेले, निलेश महाडिक …

Read More »

गणेशमूर्ती उंचीची अट शिथिल करा; रायगडातील मूर्तिकार आणि कारखानदारांची मागणी

पेण ः प्रतिनिधी दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने मूर्तिकारांच्या कामाला वेग आला आहे, मात्र राज्य सरकारकडून गणेशमूर्तींच्या उंचीवर निर्बंध घातल्याने मूर्तिकार अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींवरील उंचीची अट शिथिल करण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील पेण येथील मूर्तिकार आणि कारखानदारांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मूर्तिकारांशी चर्चा करून निर्बंध निश्चित करावेत, असे …

Read More »

चिरनेर, उरणच्या बाजारात रानभाज्या दाखल; ग्राहकांची वाढती मागणी

चिरनेर ः वार्ताहर पावसाला सुरुवात झाली की रानातील बिनखताच्या जीवनसत्त्वाने भरलेल्या हिरव्या भाज्या खायला मिळतात. उरण, चिरनेर परिसरातील आदिवासी कातकरी डोंगरावर जाऊन या भाज्या गोळा करून बाजारात विकायला आणतात. त्यामुळे आदिवासी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ह्या रानभाज्यांकडे पाहिले जाते. दरवर्षी या रानभाज्यांची लोक वाट पाहत असतात. रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची …

Read More »

जेएनपीटीत माल हाताळणीमध्ये वाढ; जूनमध्ये 441,984 टीईयूची हाताळणी

उरण ः प्रतिनिधी लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गती आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये माल हाताळणीत वाढ झाली आहे. जेएनपीटीमध्ये जून 2020च्या 289,292 टीईयूच्या तुलनेत जून 2021 महिन्यात 441,984 टीईयूची माल हाताळणी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52.78 टक्के अधिक आहे. रेल्वे …

Read More »

नवघर ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी जेएनपीटी विभागात सिडको हद्दीत असणार्‍या नवघर गावाला गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेची तहान भागली जात नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. पर्यायाने नवघर गावाला जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी  केली आहे. नवघर …

Read More »

पनवेलमधील खासगी रुग्णालयांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लससाठा

पनवेल ः प्रतिनिधी मुंबईस्थित एका नामांकित संस्थेच्या वतीने पनवेल कार्यक्षेत्रातील ज्या रुग्णालयांना कोविड लसीकरणाची परवानगी मिळाली आहे, अशा रुग्णालयांना लवकरच कोविड लसींचा साठा प्राप्त होणार आहे. ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणे शक्य आहे, त्यांनी या रुग्णालयांमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. …

Read More »

तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासन सज्ज; दररोज 8000 चाचण्या; संपर्कातील व्यक्तींचा शोध

नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर 50पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने दैनंदिन चाचण्यांवर भर दिला जात आहे. रविवार वगळता गेल्या काही दिवसांपासून सरासरी दिवसाला आठ हजार कोरोना …

Read More »

पोलादपूरच्या कुडपणमध्ये पर्यटकांची गर्दी; एसटीअभावी ग्रामस्थ मात्र झालेत स्थानबद्ध

पोलादपूर : प्रतिनिधी अनियमित एसटी बस सेवेमुळे पोलादपूर तालुक्यातील थंड हवेच्या कुडपण खुर्दमधील ग्रामस्थांना गाव सोडणे कठीण झाले असून, पर्यटक मात्र खासगी वाहनांनी ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तातडीने एसटी बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द या ब्रिटीशकालीन हिलस्टेशनचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे प्रयत्न …

Read More »