नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचारी यांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजार आवारात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी एपीएमसी घाऊक बाजार व्यापारी महासंघाचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी गरजू नागरिकांना धान्यवाटप; खारघरमध्ये नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यातर्फे उपक्रम
कळंबोली : बातमीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त खारघरमधील प्रभाग 4च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने गरीब व गरजूंना मोफत धान्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय, नोकरी, कामधंदे, रोजगार बंद असल्यामुळे बिकट परिस्थिती …
Read More »भारतीय महिला क्रिकेटपटूंना अखेर मिळणार बक्षिसाची रक्कम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारतीय संघाला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बक्षिसाची रक्कम म्हणून तीन कोटी 64 लाख रुपये इतकी मोठी रक्कम खेळाडूंना अद्याप मिळाली नाही. ही रक्कम आता …
Read More »जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा : विराट करणार विक्रम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलमध्ये जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा एक इतिहास घडवेल. या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा खेळाडू ठरले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास तो जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये चौथ्या स्थानावर पोहचेल. …
Read More »कुस्तीपटू सुशील कुमार रेल्वेच्या सेवेतून निलंबित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला अटक केलेली आहे. सुशील कुमार सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुशील कुमारला उत्तर रेल्वेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमार याच्यावरील गुन्हा प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित …
Read More »…तर कर्जत तालुका कोरोना मुक्त होऊ शकतो
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या सुरूवातीला वाढती रुग्णसंख्या, रुग्णांचे मृत्यू या बरोबरच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण या सार्यांचे पहिल्या लाटेच्या तुलनेत विक्रमच होते. मात्र लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आवरता आली. ती एकदम पाच पट कमी झाली. या सार्याला शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी आणि सुज्ञ कर्जतकरांची साथ लाभली. अजून …
Read More »शारलोटला मिळणार नवसंजीवनी; माथेरानमधील तलाव संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी
कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये ब्रिटिशांनी पिण्याच्या पाण्यासाठी शार्लोट लेक हा तलाव बांधला होता. मात्र सध्या पाणी गळती यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून शार्लोट लेकच्या संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून कोणते काम करायचे? याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी पाहणी केली. महाराष्ट्र जीवन …
Read More »मुरुड आगाराची बससेवा बंद, प्रवाशांची गैरसोय
मुरुड : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुरुड आगारातून एकही एसटी बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जाण्यासाठीही मुरूड आगारातून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. येथून खाजगी वाहतूक फक्त मुंबई पुरतीच व थेट प्रवाशांनसाठीच सुरू असून, …
Read More »एकदाचा निर्णय घ्या
छत्तीसगढ सरकारचा बारावीच्या परीक्षेचा अजब पॅटर्न वादग्रस्त ठरला असला तरी त्यांनी किमान निर्णय घेतला याचे गुण त्यांना द्यायला हवेत. महाराष्ट्रातील सरकारने अद्याप तेवढी तसदीदेखील घेतलेली नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशभरातील शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे शिक्षण सचिव आणि शिक्षणतज्ज्ञही सहभागी झाले होते. सध्याच्या परिस्थितीत …
Read More »सावधान! नाळ तुटत आहे
अनेकांना पदराला खार लावून त्यांची खरेदीही करावी लागली, पण पर्वा कुणाला? वास्तविक याच प्रकारचे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्या देशात अत्यंत स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशा डी. टी. एच. किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून देणे शक्य होते. ‘स्वयंप्रभा’ या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या आणि केवळ शिक्षणासाठी वाहिलेल्या 32 शैक्षणिक दूरदर्शन वाहिन्या मात्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper