Breaking News

Ramprahar News Team

सिडकोतर्फे भूखंड खरेदीची सुवर्णसंधी

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील घणसोली येथे 12 आणि नवीन पनवेल (पूर्व) येथे 15 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवळ निवासी वापराकरिता उपलब्ध असलेल्या या भूखंडांवर यशस्वी होणार्‍या अर्जदारांना बंगला, रो-हाऊस, इमारत किंवा निवासी प्रकारातील, त्यांच्या मनासारखे घर बांधणे शक्य होणार आहे. या भूखंडांची …

Read More »

निराधारांना ब्लँकेटची ऊब; पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा उपक्रम

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पनवेल परिसरातील थंडीत कुडकुडणार्‍या निराधारांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. निराधार आणि गरजू नागरिकांना पनवेल बसस्थानक, रेल्वेस्थानक, तक्का परिसरात मायेची ऊब देत ब्लँकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पनवेलसह रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कौतुक होत आहे. …

Read More »

साहित्य जगण्याला आत्मबळ देते -कवी अशोक बागवे

पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्य हे जगण्याला आत्मबळ देते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी केले. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट समूहाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात बोलत होते. रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरात झालेल्या स्नेहमेळाव्यास कवी अरुण म्हात्रे, प्रा. एल. बी. पाटील, कवी साहेबराव ठाणगे, सतीश सोलांकुरकर, कोमसाप …

Read More »

रिसवाडीत श्रमदानातून बांधले घर

मोहोपाडा : प्रतिनिधी आशियाना मोहिमेंतर्गत डॉ. गुरुमीत राम रहिम सिंह यांच्या डेरा सच्चा सौदा भक्तांकडून खालापूर तालुक्यातील रसायनी परिसरातील रिसवाडी येथील वयोवृद्ध लक्ष्मण दगडू पंदेकर यांना श्रमदानातून राहण्यासाठी घर बांधून देण्यात आले. गुरुमीत संत डॉ. राम रहिम सिंग जी इंसा यांच्या डेरा इंसा डेरा सच्चा सौदा शहा संत नामजी परमसुख …

Read More »

उरण ः तालुक्यातील पागोटे गावचे जितेंद्र पाटील यांची नुकतीच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांना राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …

Read More »

रुग्णालयांचा सेवाविस्तार; नवी मुंबईत नववर्षापासून होणार प्रारंभ; आयुक्तांकडून रुग्णालयाची पाहणी

नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारतीत सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागाला दिलेल्या निर्देशांचे पालन झाले की नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी (दि. 21) नेरूळ येथील रुग्णालयाच्या इमारतीला अचानक भेट देऊन पाहणी केली. …

Read More »

पमपा हद्दीतील आधार कार्ड केंद्र पुन्हा सुरू करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील आधार कार्ड केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील आधार कार्ड केंद्र मागील काही दिवसांपासून बंद …

Read More »

पाणी आणि विजेची चोरी करणार्‍यास अटक; तिघांचा शोध सुरू

पनवेल : वार्ताहर खारघर भागात पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या सिडकोच्या पाइपलाइनला अनधिकृतरीत्या जोडणी करून तसेच महावितरणची वीज चोरी करून त्या माध्यमातून सिडकोच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीररीत्या वाहनांचे सर्व्हिस सेंटर सुरू करणार्‍या चौकडीवर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यापैकी एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पंप मशिन, वॅक्युम मशिन, ब्लोअर मशिन व …

Read More »

भरमसाठ पाणी बिलास कळंबोलीकरांचा विरोध; वाढीव दर रद्द करण्याची सिडकोकडे मागणी

पनवेल : वार्ताहर सिडको वसाहतीत पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्यात आली होती. कोरोना काळात पाठवलेल्या सुधारित देयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे सिडकोने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती, परंतु आता ग्राहकांना सुधारित दरानुसार पाणी देयके पाठवण्यात आली आहेत. ही रक्कम जास्त असल्याने कळंबोलीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त करून विरोध दर्शविला आहे. …

Read More »

पनवेल : चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. याबद्दल भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी एकनाथ देशेकर, राजेंद्र पाटील, अमित जाधव, भूपेंद्र पाटील, आनंद ढवळे, अशोक साळुंखे, प्रवीण खंडागळे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

Read More »