पनवेल : वार्ताहर प्रभाग 18मधील खांदा कॉलनी येथील सेक्टर 12 येथे फुटपाथवरील ड्रेनेजना झाकणे बसविण्यात आली आहेत. ड्रेनेजना झाकणे बसविण्यासंदर्भात भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत हे कार्य करण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी विक्रांत पाटील यांचे आभार व्यक्त केले. नगरसेवक विक्रांत पाटील हे प्रभागातील …
Read More »100 ट्रीलीयन डॉलरमध्ये पडले जगाचे प्रतिबिंब!
जगातील भांडवली बाजारांचे एकूण मूल्य प्रथमच विक्रमी 100.5 ट्रीलीयन डॉलर म्हणजे सात हजार 400 लाख कोटी रुपये एवढे प्रचंड झाले आहे. या बाजारमूल्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या आणि नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या बदलांचे प्रतिबिंब दडले आहे. या सर्वव्यापी बदलांकडे आपण कसे पाहणार आहोत? सर्व जगातील अर्थव्यवस्था संघटीत होते आहे आणि …
Read More »कर्जतच्या शेतकर्याने पिकवले साडेतीन किलोचे रताळे
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील लाखरन गावामधील एका शेतकर्याने रताळ्याचे पीक घेतले असून त्यापैकी एका रताळ्याचे वजन तब्बल साडेतीन किलो आहे. लाखरन येथील प्रगतशील शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपारिक पिके घेऊन, ही पिके आपल्याकडे होत नाहीत, हे …
Read More »मुरूडमध्ये पाऊस; पिकाला धोका
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. 9) अचानक 15 ते 20 मिनिटे पाऊस पडल्याने कडधान्य व आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने स्थानीक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात भात पीक घेतल्यानतंर मुरूड तालुक्यातील शेतकरी वाल, चवळी, मुग, मटकी, हरभरे अशा कडधान्य पिकांचे तसेच सफेद कांद्याचे उत्पादन …
Read More »‘रिलायन्स’विरोधात पावसातही ठिय्या आंदोलन
नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे परिसरात बुधवारी (दि. 9) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. तरीही येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असेलेले ठिय्या आंदोलन आठशे ते हजार आंदोलनकर्त्यांनी पावसात भिजूनही चालू ठेवले. निर्णय मिळाल्याशिवाय येथून उठायचेच नाही हा त्यांनी दृढनिश्चय केला असला तरी शासन आणि रिलायन्स व्यवस्थापन यांना पाझर फुटणार तरी कधी, …
Read More »कोप्रान कंपनीविरोधात कामगारांचे उपोषण
खालापूर : प्रतिनिधी आपल्याला कामावर घ्यावे, या मागणीची तड लावण्यासाठी संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार या कंत्राटी कामगारांनी कोप्रान कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार हे दोघे कोप्रान कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून सोळा वर्षापासून काम करीत होते. त्यांना कोणतीही सूचना न देता ऐन दिवाळीच्या …
Read More »मांडला ते काकळघर रस्त्याची दुरवस्था; जनआंदोलनाचा इशारा
रेवदंडा : प्रतिनिधी जागोजागी खड्डे पडल्याने मांडला ते काकळघर या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून, येत्या पंधरा दिवसात या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मांडला व काकळघर ग्रामपंचायतींच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मांडला ते काकळघर दरम्यान या रस्त्यावर सात गावे …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकासकामे
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे तत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कोन ग्रामपंचायतीचे …
Read More »रायगडात 68 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्त र ा य ग ड ि ज ल् ह्य ा त दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, बुधवारी (दि. 9) नव्या 68 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू ओढवला, तर दिवसभरात 127 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा …
Read More »पीएम वायफाय, आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बुधवारी (दि. 9) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात पीएम वायफाय आणि आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper