Breaking News

Ramprahar News Team

पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.पनवेल महापालिकेची स्थायी समिती सभा आद्य …

Read More »

राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला झटका; भाजपची आघाडी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. चार टप्प्यांत झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप बाजी मारेल, असे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिकरं जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भाजपने पंचायत समितीच्या 1835 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला …

Read More »

राज्य सरकारला झटका; मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास ‘सुप्रीम’ नकार; जानेवारीत पुढील सुनावणी

मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणे देत अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली, मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परिणामी राज्य सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. पुढील …

Read More »

राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळावा

अलिबाग : प्रतिनिधी राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ww.roigar.mahaswayam.gov.in   या वेबपोर्टलवर हा रोजगार महामेळावा होणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग-व्यवसाय …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून होणार विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन 9 आणि 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी तसेच स्थानिक नेतेमंडळी …

Read More »

भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राची मोलाची भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) इंडिया मोबाइल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केले. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राने मोलाची भूमिका साकारली असून, कोरोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले, परंतु अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमास दूरसंचारमंत्री रविशंकर …

Read More »

शरद पवार पत्रकारांवर संतापले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ व्हायरल झालेल्या पत्रांविषयी मंगळवारी (दि. 8) पत्रकारांनी विचारले असता, पवारांचा पारा चढला आणि ते पत्रकारांवर संतापले. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त …

Read More »

डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी सुधारित कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, त्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 8) ’भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या बंदवर जोरदार टीका केली आहे. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, असा घणाघात शेलार …

Read More »

‘भारत बंद’चा रायगडात फज्जा

अलिबाग : प्रतिनिधी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मंगळवार (दि. 8)च्या भारत बंदचा रायगड जिल्ह्यात फियास्को उडाला. बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्व व्यवहार सुरू होतेे. एसटी व खासगी वाहतूूकदेेखील सुरळीतपणे चालू होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही रायगड जिल्ह्यात भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी …

Read More »

रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, सोमवारी (दि. 7) नव्या 75 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 37 व ग्रामीण 23) तालुक्यातील 60, पेण तालुक्यातील आठ, खालापूर, अलिबाग व सुधागड …

Read More »