Breaking News

Ramprahar News Team

पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; शिखर बँक घोटाळा

मुंबई : प्रतिनिधी शिखर बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान मिळाले असून, या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर मोहन अरोरा यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यांच्यासोबत इतरही काही लोकांनी …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये कोणालाही आता जमीन खरेदी करता येणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करून तेथे स्थायिक होऊ शकते, मात्र शेतजमिनीवरील बंदी अद्याप कायम असणार आहे. या संदर्भात गृह मंत्रालयाने मंगळवारी (दि. 27) अधिसूचना जारी केली आहे. याबाबत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरचे उद्योग …

Read More »

मुंबईत हाय अलर्ट!; दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ड्रोनला बंदी

मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, संपूर्ण शहरात ड्रोन तसेच तत्सम गोष्टींच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी मुंबईत गर्दीच्या ठिकाणांना आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करू …

Read More »

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली; सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीमुळे संताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी सुरू झाली त्या वेळी सरकारी वकील अनुपस्थित होते. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची टीका होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मंगळवारी (दि. 27) पहिल्यांदाच ही सुनावणी झाली. या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले …

Read More »

रायगडात 109 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला असून, रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सोमवारी (दि. 26) नव्या 109 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 233 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 72 व ग्रामीण 13) तालुक्यातील 85, खालापूर नऊ, उरण व …

Read More »

पनवेल : वैभव देशमुख इन्फ्रा प्रा. लि.च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आदी उपस्थित होते.

Read More »

कर्मचार्‍यांसाठी गुड न्यूज!; अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात केली होती, मात्र आता सर्वकाही रूळावर येत असल्याने यापैकी बहुतेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे काही कंपन्या कर्मचार्‍यांच्या पगारवाढीचा विचारही करीत आहेत, तर काही कंपन्या कर्मचार्‍यांना बोनस देण्याचाही विचार करीत आहेत. मुकेश …

Read More »

रोह्यात धावीर महाराजांचा पालखी सोहळा साधेपणाने; अडीच तासांत पालखी मंदिरात पुन्हा दाखल

रोहे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सोमवारी (दि. 26) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर भाविकांनी शहरात ठिकठिकाणी सुरक्षित अंतर राखून पुष्पवृष्टी करून दर्शन घेतले. दसरा संपला की दुसर्‍या दिवशी श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सुरू होतो. त्यानुसार  सोमवारी सकाळी पूजा-अर्चा व विधी झाल्यावर …

Read More »

अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जासिम इस्माईल गॅस यांनी उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.  अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी अ‍ॅड. इर्शाद रमझान शेख, समीर कादिर पटेल, उपाध्यक्षपदी नासिर नूरा शेख, …

Read More »

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे लायकच नाहीत; खासदार नारायण राणेंचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणे होते, अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. शेतकर्‍यांचे प्रश्न, योजना, कोरोनाचे संकट याबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावे, कसे बोलावे हे अजून कळत नाही. मुख्यमंत्रिपदासाठी …

Read More »