पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, शुक्रवारी (दि. 23) नव्या 169 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 218 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 34) तालुक्यातील 125, अलिबाग 13, पेण 10, खालापूर सात, महाड …
Read More »रायगडात ग्रामपंचायतींचा रणसंग्राम; 87 ठिकाणी डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याच्या हालचाली
अलिबाग ः प्रतिनिधी जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात घेण्याच्या द़ृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये कोविड-19ची परिस्थिती काय आहे याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने मागविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनदेखील या रणसंग्रामाच्या तयारीला लागले …
Read More »महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकर्यांच्या दाढेलाही पुरणार नाही; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका
पोलादपूर : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले 10 हजार कोटींचे पॅकेज अपुरे असून, ही मदत शेतकर्यांच्या दाढेलाही पुरणार नाही. कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात शेतकर्यांकडे असलेली जमीन धारणा अत्यल्प आहे. परिणामी शेतकर्यांपर्यंत गुंठ्याला 100 रुपये मदत जरी पोहोचली तरी शेतातील पिकाची नासाडी साफ करण्यासाठीच त्यापैकी 50 रुपये जातील. शेतकरीवर्ग …
Read More »कोरोना संकटात भाजप कार्यकर्त्यांकडून जनतेसाठी जबाबदारीने काम; आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप कार्यकर्त्यांनी कोणतेही राजकारण न करता कोरोना काळात लोकांसाठी जबाबदारीने काम केले, असे गौरवोद्गार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) येथे काढले. ते ई-पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »पनवेल महानगरपालिकेचा जनतेला दिलासा देणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प मंजूर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी सन 2019-20चा सुधारित आणि सन 2020-21चा मूळ अंदाजपत्रक सादर केलेल्या 945 कोटींची जमा, खर्च 943.42 कोटी आणि शिल्लक 1.59 कोटींच्या अर्थसंकल्पास गुरुवारी (दि. 22) महासभा आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मान्यता दिली. जनतेला कोरोना काळात दिलासा देणारा …
Read More »रायगड जिल्ह्यात 208 नवे पॉझिटिव्ह; नऊ रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, गुरुवारी (दि. 22) नव्या 208 रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 275 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 136 व ग्रामीण 36) तालुक्यातील 172, रोहा व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, खालापूर …
Read More »कोरोना रुग्णांनी धरला ठेका; नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलमध्ये गरबा
नवी मुंबई : वार्ताहर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नवी मुंबईच्या नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे बुधवारी (दि. 21) गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या रुग्णांनी या वेळी पीपीई कीट घालून उत्तम प्रतिसाद दिला. यापूर्वी तेरणा हॉस्पिटलतर्फे कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना बसल्या जागेवरून …
Read More »रायगडात सलग तिसर्या वर्षी शेतीचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात सुमारे 16 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने सलग तीन वर्षे जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सन 2018मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीन हजार हेक्टरवरील भातशेती संकटात सापडली होती. 2019-20मध्ये ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 27 हजार हेक्टरवरील भातशेतीचे …
Read More »खडसेंच्या प्रवेशावरून आघाडीतील आमदार नाराज
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी (दि. 23) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, मात्र महाविकास आघाडीसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरू शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. आमदार पाटील हे मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या …
Read More »पागोटेच्या उपसरपंच, सदस्यांसह शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे शेकाप उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 22) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. उरण भाजप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper