Breaking News

Ramprahar News Team

रायगडात 125 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 125 कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 29) झाली, तर दिवसभरात 228 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 22) तालुक्यातील 99, खालापूर आठ, पेण पाच, अलिबाग चार, कर्जत, रोहा, महाड प्रत्येकी दोन, तर तळा, श्रीवर्धन, …

Read More »

प्रत्येक भारतीयाला मिळणार कोरोना लस : पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी संकट पूर्णपणे टळले नाही. जेव्हा कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा …

Read More »

शरद पवारांकडे सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट; चंद्रकांत पाटील यांची टीका

सांगली ः प्रतिनिधी राज्यातील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळे त्यांनाच भेटले पाहिजे. शिवाय मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल व शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 29) सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली. …

Read More »

कुंथत कुंथत सरकार चालत नाही; राज ठाकरेंचे राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही, पण आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे. ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. गुरुवारी (दि. 29) त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. …

Read More »

सरपंचांवरील अविश्वास पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक

अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचावर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने तसे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत होती, मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच ग्रामपंचायत अधिनियमात बदल करण्यात आला. …

Read More »

तटकरेंचा सत्तेचा माज जनता उतरवेल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात; पेणमधील निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण ः अनिस मनियार एखाद्या घटनेचे राजकीय स्वार्थासाठी भांडवल करून घेणे ही खासदार सुनील तटकरे यांची वृत्ती असून गेली 20-25 वर्षांत विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल हे निर्विवाद सत्य आहे. प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला …

Read More »

रायगडात 148 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 148 कोरोना रुग्णांची आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 221 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 34) तालुक्यातील 117, अलिबाग आठ, खालापूर सात, उरण व पेण प्रत्येकी पाच, कर्जत दोन आणि माणगाव, सुधागड, …

Read More »

सूडबुद्धीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आज पेणमध्ये मोर्चा

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात नगर परिषदेच्या सभेमध्ये झालेल्या तथाकथित प्रकरणावरून दाखल तांत्रिक गुन्ह्यात गटनेते अनिरुद्ध पाटील यांना अडकविण्याचे कट-कारस्थान तसेच पोलीस प्रशासन यंत्रणेने रात्रीच्या सुमारास आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी अनिरुद्ध पाटील यांना पकडण्यासाठी घेतलेली झाडाझडती या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पेणमध्ये गुरुवारी (दि. 29) निषेध मोर्चा व …

Read More »

रुग्णाचा मृत्यू; नवी मुंबई पालिका रुग्णालयाची नातेवाइकांकडून तोडफोड

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यात हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, तर डॉक्टर आणि नर्सना धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी …

Read More »

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी खुशखबर!; स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची चिन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटचे सामने आणि प्रेक्षक हे एक यशस्वी समीकरण मानले जाते. क्रिकेटच्या सामन्याला जितकी प्रेक्षकांची हजेरी जास्त, तितका सामन्याला रंग चढत असतो, पण कोरोनाच्या काळात क्रिकेट आणि प्रेक्षक यांची ताटातूट झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विनाप्रेक्षक सामना खेळवण्यात आला. त्यानंतर जवळपास चार ते पाच महिने क्रिकेट बंद …

Read More »