पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 27) 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची व 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 519 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 329, अलिबाग 57, पेण 32, कर्जत व माणगाव प्रत्येकी 18, रोहा 11, खालापूर नऊ, महाड आठ, पोलादपूर सात, …
Read More »कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब; विरोधकांची मागणी फेटाळली
नवी दिल्ली ः संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (दि. 27) मंजुरी दिली. पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेशातील शेतकर्यांनी ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली होती, तर राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी विरोधकांनी केली होती, पण ही मागणी फेटाळून लावत राष्ट्रपतींनी …
Read More »मुरूडचा समुद्रकिनारा पुन्हा गजबजला; पर्यटन पूर्वस्थितीत येण्याचे संकेत
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुरूड समुद्रकिनारा मागील पाच महिने पर्यटकांविना सुनासुना झाला होता. मार्च अखेरीस पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले व संचारबंदी झाल्याने पर्यटक घराबाहेर पडणे बंद झाले. भीतीच्या वातावरणात पूर्ण कोकणातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. 720 किमीचा समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात दरवषी लाखो पर्यटक येत होते, पण …
Read More »’ती’ भेट अराजकीय; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापण्याची कोणीतीही घाई नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासोबत झालेली भेट अराजकीय असून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट …
Read More »शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटाचा सामना अत्यंत प्रभावीपणे करू शकतो. आपल्या देशातील शेतकरी हे याचेच उत्तम उदाहरण आहे. देशातील शेतकर्यांनी कोरोनाच्या संकटकाळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिले आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा कणा आपल्या देशातील शेतकरीच आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र …
Read More »भाजपकडून गरजूंना चष्मेवाटप
खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि खारघर तळोजा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू लोकांसाठी सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चश्मे वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 24) खारघर सेक्टर 12 येथील …
Read More »जांभिवली गावच्या रस्त्याचे भूमिपूजन; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जांभिवली गाव आणि जांभिवली वाडी यांची जाण्या-येण्याची होणारी अडचण लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चाने व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जांभिवली गावाच्या अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले. या नवीन रस्त्याचे रविवारी (दि. 20) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या …
Read More »कोरोना महामारीत काम करणार्या डॉक्टर्स आणि पत्रकारांचा सन्मान; बीड खुर्द भाजपचा स्तुत्य उपक्रम
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव पसरू नये यासाठी देशांतर्गत टाळेबंदी केली तेव्हापासून ग्रामीण भागातील नागरिकांनी शहराकडे पाठ फिरवली असून, अशा काळात धीर देणारे डॉक्टर्स व आशा वर्कर तसेच पत्रकारांचा सन्मान भाजप युवा मोर्चा विभाग अध्यक्ष लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून भाजप बीड खुर्दच्या वतीने करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग पाहता …
Read More »पोस्ट खात्याचा कारभार इंटरनेटअभावी ठप्प
मुरूड : प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून तसेच अधूनमधून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे मुरूड येथील पोस्ट खात्याचा कारभार वारंवार ठप्प होत होत असून, ग्राहकवर्ग त्रस्त होत आहे. बीएसएनएल टेलिफोन कार्यालयाकडून पोस्ट कार्यालयास नेटची सुविधा पुरविली जाते, मात्र बीएसएनएलकडून नेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने आणि प्रभावी कार्यवाही होत नसल्याने ग्राहकांना …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नियुक्ती करा; कर्जत भाजपची मागणी
कर्जत : बातमीदार कोविड सेंटरमधील महिला रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र अजूनही प्रशासन महिला रुग्णाबाबत सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे कर्जत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. कोविड सेंटरमधील महिलांची अत्याचारापासून बचाव आणि सुरक्षा होण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात याबाबतीत निवेदन देण्यात आले.कर्जतमध्ये उपजिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper