पनवेल : वार्ताहर पळस्पे फाटा येथे अवैधरीत्या साठा करून ठेवलेल्या शासकीय रेशन तांदळाच्या साठ्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या टेक केअर लॉजिस्टिक पार्क इंडिया प्रा. लि. कंपनीचे गोदाम मी मे. हिंद टर्मिनल्स प्रा. लि. कंपनीला पाच वर्षांकरिता पूर्ण जबाबदारीनिशी भाड्याने दिलेले आहे. त्यामुळे या गोदामात घडलेल्या गुुन्ह्यातील आरोपींमधून माझे नाव …
Read More »कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर रुग्णवाहिकेत बलात्कार; चालक अटकेत
तिरूअनंतपूरम : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांनी चिंता व्यक्त होत असताना माणुसकीला काळीमा फासणार्या काही घटना घडत आहेत. केरळमध्येही अशीच घटना घडली असून, कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना चालकाने रुग्णवाहिकेतच तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे संंताप व्यक्त होत आहे. केरळमधील पथाणमथिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली. एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला …
Read More »सांगलीत सात आमदारांसह डझनभर नेते कोरोनाबाधित
सांगली : प्रतिनिधी शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले …
Read More »वीज बिलमाफीसाठी भाजप आक्रमक; मुरूडमध्ये आज बिल दहन आंदोलन
मुरूड : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जनता त्रस्त असून, दोन महिने काही ठिकाणी विद्युतपुरवठा सुरळीत नसतानाही महावितरणने वाढीव वीज बिले आकारली आहेत. राज्य सरकारच्या या अनागोंदी कारभाराविरोधात आणि वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत, या मागणीसाठी मुरूडमध्ये सोमवारी (दि. 7) वीज बिल दहन आंदोलन करण्यात येणार आहे. …
Read More »कोरोना रुग्णांमध्ये भारत दुसर्या स्थानी; ब्राझीलला टाकले मागे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. देशात कोविड-19 विषाणूने 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत, तर आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिलला मागे टाकले …
Read More »काँग्रेसमध्ये फुटला आणखी एक ‘लेटर बॉम्ब’
लखनऊ ः काँग्रेसमधील कलह लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या ’लेटर बॉम्ब’नंतर आता आणखी एक ’लेटर बॉम्ब’ फुटला आहे. या वेळी तो उत्तर प्रदेशचा आहे. गेल्या वर्षी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेस पक्षाला इतिहासजमा …
Read More »चिरनेर वनक्षेत्रात साकारले नक्षत्र वन
उरण : प्रतिनिधी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी नेहमी अग्रेसर असणार्या वन्यजीव निसर्ग संरक्षण आणि वटवृक्ष फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या सहकार्याने चिरनेर हद्दीतील वनक्षेत्रावर सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 3) नक्षत्र वन निर्माण करण्यासाठी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले. या संकल्पनेनुसार विविध प्रकारच्या जंगली पण औषधी झाडांच्या रोपांची …
Read More »उरण मोरा ते भाऊचा धक्का जलवाहतूक पुन्हा सुरू
उरण : वार्ताहर लॉकडाऊन झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आत्या होत्या. त्याच अनुषंगाने उरणकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ही प्रवासी जलवाहतूक (लॉंचसेवा) गुरुवार (दि. 3) पासून सुरू करण्यात आली आहे. मोरा …
Read More »कोरोनाबाधित विद्यार्थ्याने दिली रुग्णालयातून परीक्षा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आई-वडिलांसह कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 13 वर्षीय मुलाने रुग्णालयात उपचारादरम्यान आठवीची ऑनलाइन परीक्षा दिली. त्यासाठी त्याला नवी मुंबईतील नेरूळ येथील एका रुग्णालयाने सर्वोपरी मदत केली. नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथे राहणार्या नीलेश कदम, पत्नी निशी आणि मुलगा निरंजन (13) यांना कोरोना …
Read More »नियमांचे पालन न केल्याने कोरोना संसर्गात वाढ
पनवेल : बातमीदार पनवेल शहरात गणशोत्सवानंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे. दरदिवशी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील 19 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात घराघरांत झालेल्या गर्दीमुळे सामाजिक अंतराच्या नियमाला हारताळ फासल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper