Breaking News

Ramprahar News Team

बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; देशातील पहिली डिजिटल निवडणूक

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे. बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामात सहभाग …

Read More »

ठाकरे सरकारसमोर नवे विघ्न; 11 आमदार बसणार उपोषणाला; निधी वाटपाबाबत नाराजी

मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकारमधील मानापमान नाट्य काही थांबताना दिसत नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही, हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपातही भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला. परिणामी या आमदारांनी सरकारविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे …

Read More »

रायगडात 298 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 23) 298 नव्या कोरोना रुग्णांंची नोंद झाली, तर 10 रुग्णांंचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 381 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 173, अलिबाग 35, महाड 27, रोहा 14, उरण 11, पेण 10, माणगाव नऊ, कर्जत चार, पोलादपूर दोन, तर सुधागड, श्रीवर्धन …

Read More »

पनवेल : महापालिकेत समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास सभापती प्रवीण पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. त्याबद्दल या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी आभार मानले. या वेळी नितीन भगत, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

कृष्णजन्म व मातृशक्ती विषयावर ऑनलाइन कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने कृष्णाष्टमी आणि मातृदिनानिमित्त ’कृष्णजन्म व मातृशक्ती’ हा ऑनलाइन कार्यक्रम झाला. कल्याण येथील मंजिरी फडके या कार्यक्रमाच्या प्रमख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ’कृष्णजन्म आणि मातृशक्ती’ या विषयावर त्यानी विचार मांडले. या विषयावर भाष्य करताना मातृशक्ती ही एक संकल्पना असल्याचे …

Read More »

डिझेल चोरी करणार्‍या आरोपींना अटक

पनवेल : बातमीदार, वार्ताहर तळोजा पोलीस ठाण्याच्या औद्योगिक क्षेत्रात डिझेल चोरी करणारे तीन आरोपींना तांत्रिक तपासाद्वारे तळोजा पोलीस ठाणे कडून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीचे 350 लिटर डिझेल व चोरीसाठी वापरण्यात येणारे तीन चारचाकी वाहने असा एकूण 15 लाख 27 हजार 650 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. …

Read More »

खांदा वसाहतीतील खड्डे, पदपथ दुरुस्त; नगरसेविका सीता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीत अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनत होते. त्याचबरोबर काही जागांवर पदपथ सुद्धा तुटलेल्या आहे. त्यापैकी काहींची दुरुस्ती करून खड्डे बुजवण्याचे काम सिडकोने बुधवारपासून हाती घेतले आहे. नगरसेविका सीता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वसाहतीतील रहिवाशांची काही प्रमाणात का होईना गैरसोय कमी होणार आहे. …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या यशश्री मुरकुटे यांची निवड

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीत असलेल्या कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा मुकेश परशुराम पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवड ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या वेळी उपसरपंचपदासाठी यशश्री योगेश मुरकुटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुक अधिकारी म्हणून ग्रामसेवक संदिप धारणे …

Read More »

बाजारपेठा भाविकांनी फुलल्या; गणेशभक्तांचा उत्साह कायम

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन शनिवारी (दि. 22) घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरुपात होणार आहे. यामुळे बाप्पाच्या सेवेसाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पनवेलच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली होती. काही नागरिक नियमांचे पालन करीत तर काही नागरिक नियमांचे उल्लघंन करीत असल्याचे ही …

Read More »

शासकीय कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरानमध्ये कोविडचा प्रदुभाव रोखण्याकरिता नगरपालिकेने येथील शासकीय कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी घेऊन परिपूर्ण खबरदारी घेतली आहे. यामध्ये नगरपालिका कर्मचारी, पोलीस, महसूल विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. माथेरान हे जगविख्यात पर्यटनस्थळ असल्याने येथे लाखो पर्यटक भेट देतात. मागील सहा महिन्यांपासून कोविडमुळे माथेरान लॉकडाऊन आहे, मात्र माथेरानबाहेरून येणार्‍या …

Read More »