Breaking News

Ramprahar News Team

पनवेल तालुक्यात 124 नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू; 150 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 8) 124 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा  मृत्यू झाला आहे. तर 150 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 93  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 117 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल …

Read More »

पनवेलमध्ये दीक्षा अ‍ॅपची ज्ञानगंगा पोहचली घरोघरी; 85 दिवसांपासून 12 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण

पनवेल : बातमीदार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घंटा मागील अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात बंद असली तरी येथील शिक्षण विभाग विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी झटत आहे. दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत 85 दिवसांपासून शिक्षण सेवा सुरू ठेवण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 248 शाळा असून त्यामध्ये …

Read More »

उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर बदली झाली आहे. अवधूत तावडे यांनी 14 जून 2018 रोजी उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती. मुख्याधिकारी तावडे यांना नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या वतीने  निरोप देण्यात आला. या वेळी उरण नगरपरिषदेचे सुप्रिडेंट …

Read More »

उरणमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पूर्व विभागात मागील आठवडा भरात वीज पुरवठा खंडित होत असून, यामुळे अनेकांना त्याचा फटका बसत आहे. गावखेड्यातील लघुउद्योगांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. अचानक खंडित होणार्‍या विज पुरवठ्यामुळे अनेकांच्या घरातील विजेची उपकरणे नादुरुस्त होत आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिने हाताला कोणत्याही प्रकाचे काम …

Read More »

मोहोपाडा हद्दीत 15 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 77 वर

मोहोपाडा : वासांबे (मोहोपाडा) हद्दीत बुधवारी दुपारपर्यंत आळी आंबिवली एक पुरुष, मोहोपाडा दोन पुरुष, नवीन पोसरी दोन पुरुष, चांभार्ली वृंदावन एक पुरुष, दुर्गामाता कॉलनी रिस एक पुरुष,अपुर्वा वसाहत रिस एक, पंचरत्न रिस पाच एकाच कुटुंबातील (दोन महिला-दोन पुरुष आणि लहान मुलगा), तळेगाव एक पुरुष असे 15 कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाचे …

Read More »

पोलिसांकडून 175 रिक्षा जप्त; वाशी टोलनाक्यावर टाळेबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी

पनवेल : बातमीदार नवी मुंबईत कठोर टाळेबंदी सुरू केली आहे. मुंबईतून अत्यावश्यकसेवेव्यतिरीक्त अन्य कोणालाही शहरात येऊ दिले जात नाही. याच कारवाई दरम्यान 175 हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व रिक्षा नवी मुंबईतील टाळेबंदी संपल्यावर परत देण्यात येणार आहेत. वाशी टोल नाक्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे. नवी …

Read More »

नवी मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग; एक लाख 60 हजार चाचण्यांचे लक्ष्य

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी येत्या काळात एक लाख 60 हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यास पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. नवी मुंबईत बाधितांची संख्या 8072 झाली आहे, तर आजवर 260 जण मृत्युमुखी पडले आहेत. मुंबईप्रमाणेच चाचण्यांची गती वाढवून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा …

Read More »

सरकारची नाचक्की

विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील तीन चाकी आघाडी सरकार चांगलेच तोंडावर पडले आहे. या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने सोमवारी दिला. अधिकार नसताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी …

Read More »

उरण ः शहरातील बाजारपेठेत असलेले राजपाल नाका येथील मोबइल चॉइस एन एक्सचे उद्घाटन भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मननशेठ पटेल, भरत चौधरी, हितेश शाह, अजित भिंडे, सागर मोहिते, हस्तीमल मेहता आदी उपस्थित होते.

Read More »

सततच्या पावसाने कार्वी प्रकल्प जमीनदोस्त

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर यांचा कार्वी प्रकल्प सततच्या पावसामुळे सोमवारी कोसळला. या वेळी तेथे कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचे 40 हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाने सार्‍यांचे मोठे नुकसान केले होते. अनेकांचे प्रकल्पदेखील यात मोडून पडले आहेत. इको …

Read More »