कामोठे ः प्रतिनिधी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. अटी-शर्थींसह जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. असे असले तरी ते अपरिहार्य झाले आहे. अशा परिस्थितीत एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामोठ्यातील उषा डुकरे आणि बिबीषण डुकरे दाम्पत्य …
Read More »वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून 38 जणांवर कारवाई
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलली असून मास्क न वापरणार्या 36 जणांवर कारवाई करीत 15,200 रुपयांचा दंड वसूल केला, तर बाजारपेठेतील दोन दुकानदारांकडून ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्ससाठी उपाययोजना न केल्याने ग्राहक गर्दी करीत असल्याने …
Read More »‘मूषक नियंत्रण कामगारांवरील अन्याय दूर करा’
नवी मुंबई ः बातमीदार जुलै महिना उजाडला तरी अजून पालिकेत मूषक नियंत्रण विभागात काम करणार्या कामगारांचे मे व जून महिन्याचे वेतन झाले नाही. त्यामुळे मूषक नियंत्रण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत होणारा अन्याय दूर करण्याची मागणी सानपाड्यातील भाजप कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका …
Read More »कोरोनाच्या संकटातही कामगार भरतीसाठी मुलाखती; भाजप कार्यकर्ते आक्रमक
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी मोहोपाडा परिसरातील एनआयएसएम सेबी रस्त्यालगत जय प्रेसिजन प्रोडक्ट कंपनी आहे. या कंपनीतील काही कामगारांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह येत आहेत. शिवाय कंपनीतील बरेच कामगार व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच जय कंपनीने हा डाव साधून बाहेरील कामगारांच्या मुलाखती सुरू केल्याने त्या …
Read More »चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा हात
पाली ः प्रतिनिधी कोरोना आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद सेवा मंडळ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पंचशील नगर, झेंडेवाडी येथील 250 चक्रीवादळग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चक्रीवादळामुळे अनेक जणांचे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक सामान व …
Read More »नागोठण्यात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव
नागोठणे ः प्रतिनिधी शहरासह विभागाची कोरोना रुग्णांची दोन महिने पाटी कोरी असतानाच काही दिवसांपासून कोरोनाने येथे शिरकाव करीत रोज आपली संख्या वाढतीच ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात चार दिवसांपूर्वी ब्राम्हण आळीतील एका सरकारी कर्मचार्याला कोरोनाची लागण लागल्यावर संबंधित व्यक्तीच्या 55 वर्षीय आईलाही कोरोनाने गाठले आहे. येथील सूर्यदर्शन कॉलनीच्या परिसरात चार …
Read More »निसर्ग चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांच्या व्यथा
निसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिना उलटून गेला. तरीही वादळग्रस्तांच्या समस्या कायम आहेत. आधीच कोरोना या वैश्विक महामारीचा सामना करताना कोकणवासीय त्रस्त असताना नैसर्गिक आपत्तीने त्यांचे वर्तमान पुरते उद्ध्वस्त झाले असून, भविष्याबाबतही चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने त्यांना सर्वतोपरी साह्य करणे आवश्यक असताना साध्या मूलभूत सेवाही नीटपणे पुरविल्या जात …
Read More »निजामपुरात कोरोनाचा शिरकाव; बाधितांची संख्या 55
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात निजामपूर गावात कोरोनाने शिरकाव केला असून येथे एक 25 वर्षीय तरुण, माणगाव येथील एक, मोर्बा येथील दोन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील 13 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती …
Read More »कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना सहज जेवण डबा; सहजसेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील कोविड रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या घरी जेवण बनविण्यासाठी कोणी नसेल किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेल अथवा त्यांच्या घरी छोटी मुले किंवा वृद्ध व्यक्तींना जेवणाची गैरसोय होत असेल तर त्यांच्यासाठी घरपोच निःशुल्क जेवण …
Read More »मी कर्जतकरचा नागरिकांना दिलासा; आरोग्य सुविधा कर्जतकरांच्या दारी
कर्जत ः बातमीदार कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. या विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार करून पुढे गेला आहे. त्या अनुषंगाने कर्जत येथील भाजपच्या किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांच्याकडून कर्जतमध्ये मी कर्जतकर हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper