Breaking News

Ramprahar News Team

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 14) समोर आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तो 34 वर्षांचा होता. करिअरच्या शिखरावर असताना त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांना धक्का बसला आहे. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली, असे …

Read More »

रायगडात तब्बल 81 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 14) एकाच दिवसात कोरोनाच्या तब्बल 81 रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 44, पनवेल ग्रामीणमधील 13, कर्जत तालुक्यातील 10, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी चार, उरण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि मुरूड व तळा तालुक्यातील …

Read More »

उद्ध्वस्त कोकणवासीयांना राज्य सरकारने पाठबळ द्यावे; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भूमिका

माणगाव : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ती लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी नुकसानग्रस्तांना संकटकाळात सर्वतोपरी पाठबळ देणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. 12) येथे मांडली. कोरोना या वैश्विक संकटाने त्रस्त असलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यावासीय नैसर्गिक …

Read More »

रसायनीतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असताना रसायनी परिसरातही कोरोनाने शिरकाव करून भीती निर्माण केली होती, परंतु 12 रुग्णांनी धैर्य दाखवून या महामारीवर मात केली आहे. रसायनी-मोहोपाडा परिसरातील शिवनगरवाडीतील तीन, भटवाडी एक, श्रीहरी पार्क (हरिओम पार्क) दोन, रिस नवीन वसाहत-दुर्गामाता कॉलनी येथे दोन, दापिवली तीन आणि वावेघरमधील …

Read More »

मुरूड तालुका अद्यापही अंधारात

मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्यात वीज मंडळाचे अतोनात नुकसान होऊन 650पेक्षा जास्त पोल निकामी झाले, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या 12 दिवसांपासून खंडित आहे. परिणामी मुरूड शहरासह तालुक्यातील 72 गावे अंधारात आहेत. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून तेथे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, …

Read More »

संतांच्या पालख्यांचे साधेपणाने प्रस्थान; पुन्हा स्थिरावल्या मंदिरात

देहू, पैठण : प्रतिनिधी मोजके वारकरी व मानकर्‍यांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीने शुक्रवारी (दि. 12) दुपारी साधेपणाने प्रस्थान ठेवले, पण ती पुढे विठूरायाच्या भेटीसाठी निघाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पालखी मूळ मंदिरातच स्थिरावली. संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्येही असेच चित्र पहावयास मिळाले. पालखी सोहळ्यानंतर संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या …

Read More »

भाजपचे विनोद घरत यांनी दणका देताच खारघरच्या मैदानातील कचरा डेपो हटवला

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचे संकट असताना खारघरमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कचरा डेपो बनवण्याचा ठेकेदार आणि प्रशासनाचा प्रयत्न भाजपचे खारघर तळोजा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उधळून लावला. त्याबद्दल खारघरवासीयांनी भाजपच्या शिलेदारांना धन्यवाद दिले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघरची ओळख स्मार्ट सिटी म्हणून आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कचरा …

Read More »

वादळाने हतबल रायगडकरांना आता पावसामुळे भरली धडकी

पाली : प्रतिनिधी चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यातच आता वरुणराजाने वर्दी दिल्याने या वादळग्रस्तांची चिंता वाढली आहे. चक्रीवादळात अनेकांच्या घरांचे पत्रे, कौले उडून फर्निचर, अन्नधान्य, भांडी असे सारे काही भिजून मोठे नुकसान झाले आहे. सध्या बाजारात घर दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले पत्रे, सिमेंट, पाईप …

Read More »

चक्रीवादळग्रस्तांना प्रदेश भाजपकडून मदतीचा हात

माणगाव : प्रतिनिधी कोरोना संकटानंतर कोकणावर निसर्ग चक्रीवादळाने महासंकट कोसळले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, नेतेमंडळी यांनी पाहणी दौरे केले, मात्र रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आज आठ दिवस उलटूनही राज्य शासनाच्या प्राथमिक मदतीपासून वंचित आहे. अशा वेळी विरोधी पक्ष असलेला भाजप जनतेसाठी धावून आला आहे. भाजपच्या वतीने वादळग्रस्तांना मदतीचा हात …

Read More »

रायगडात चौघांचा मृत्यू; 45 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात हातपाय पसरू लागला असून, काही रुग्णांचा बळीही घेत आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 12) आणखी 45 रुग्णांची नोंद झाली असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 30, उरण तालुक्यातील सात, पनवेल ग्रामीणमधील चार, पेण तालुक्यातील दोन, तर कर्जत व रोहा तालुक्यातील …

Read More »