Breaking News

Ramprahar News Team

रेम्बो सर्कस कर्मचार्‍यांना दिलासा; आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून अन्नधान्याची मदत

नवी मुंबई ः प्रतिनिधी ऐरोली सेक्टर-10मधील मोकळ्या भूखंडावर रेम्बो सर्कसकडून लहान मुलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या करमणुकीकरिता खेळ सुरू होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हे खेळ बंद पडले. परिणामी तेथे अडकून पडलेले 95 कर्मचारी व कलाकार हालअपेष्टा सहन करीत आहेत. त्यांना जेवणाची व्यवस्थाही नसून सिलिंडर आणायला …

Read More »

‘जीवनज्योत’ने भागवली वृद्धाश्रमाची तहान

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका निसर्गाने समृद्ध असला तरी उन्हाळ्यात येथे पाण्याचे भीषण संकट उभे राहते. आदिवासीबहुल भाग असलेल्या तालुक्याच्या अनेक भागांत पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शिलार गावाजवळ असलेल्या वृद्धाश्रमात बोअरिंगची भूजल पातळी आटल्याने येथील वृद्धांना जल संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तहानलेल्या वृद्धांच्या मदतीला जीवनज्योत सामाजिक संघटना …

Read More »

इनोव्हेशन कार्निव्हलची धूम; मुलांच्या कल्पकतेला चालना

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लहान मुलांना खेळता, बागडता येत नाही. त्यामुळे ही मुले घरीच आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. अशातच अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन समर कॅम्प उपक्रमात आता अशा मुलांचा वेळ सार्थकी लागणार आहे. कारण या माध्यमातून इनोव्हेशन कार्णीवल हा …

Read More »

आशीर्वाद अन् औक्षण पनवेल : महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर, बंधू आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी आईसह पत्नी अर्चना ठाकूर यांनी त्यांचे औक्षण केले.

Read More »

माणगावमधील दुकानांच्या वेळापत्रकात बदल; भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या मागणीला यश

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव शहरासह तालुक्यातील गरजेच्या असणार्‍या दुकानांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून चौथ्या लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच माणगावमधील गरजेची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत शासनाच्या सूचनेनुसार सुरू राहतील, …

Read More »

सर्पमित्राकडून नागाला जीवदान

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंड्यातील हवालदार यांच्या निवासस्थानी भरवस्तीत नाग घुसल्याने एकच हाहाकार उडाला होता. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र दुशांत झावरे यांनी त्वरेने या ठिकाणी जाऊन नागाला पकडले. त्यानंतर या नागाला सुरक्षितपणे फणसाड अभयारण्यातील जंगल भागात सोडून देण्यात आले. सध्या कडक उन्हाने हवामान तप्त झाले आहे. त्यामुळे थंडावा शोधण्यासाठी नागाने भरवस्तीतील …

Read More »

पायी गावी निघालेल्या नागरिकांसाठी वाहनांची सोय

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीतून बचावासाठी मुंबई तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरून पायपीट करीत कोकणातील आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता अबालवृध्दांसह हजारो नागरिक चालत जात असल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मागील तीन दिवसांपासून रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार कविता जाधव …

Read More »

पीओपी मूर्तिबंदी पुढे ढकला; पेणच्या मूर्तिकारांचे पर्यावरणमंत्र्यांना साकडे

पेण ः प्रतिनिधी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी आणि इतर अनेक निर्बंधांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक मूर्तिकारांना फटका बसण्याची शक्यता आहे. पेण येथील मूर्तिकारांनाही या निर्णयाची झळ बसणार असून या निर्णयामुळे पेणमधील मूर्तिकार रस्त्यावर येण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे पेण येथील श्री गणेश मूर्तिकार आणि …

Read More »

खारघरमधील महिलेचा मृत्यू; पनवेल तालुक्यात 22 नवे कोरोनाग्रस्त; रायगड जिल्ह्याचा आकडा पाचशेपार

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, 13 नवीन रुग्ण आढळले  आहेत, तर ग्रामीणमध्ये नऊ नव्या रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागानेही कोरोनाच्या रुग्णांची शंभरीपार केली आहे. याशिवाय इतर ठिकाणचे रुग्ण मिळून जिल्ह्याचा एकूण आकडा 518वर पोहचला आहे.  पनवेल महापालिका हद्दीत नवीन पनवेल सहा, …

Read More »

गुड न्यूज! पनवेलमध्ये 100हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!!

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी त्यासोबतच या महामारीतून बरे होणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे. तालुक्यातील 142 रुग्ण रविवार (दि. 17)अखेर ठणठणीत बरे झाले आहेत. पनवेल तालुक्यात कामोठे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर खारघर, कळंबोली, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल व पनवेलमध्ये …

Read More »