Breaking News

Ramprahar News Team

कर्जतमधील मिरची विक्री चार दिवस बंद

कर्जत : प्रतिनिधी कर्जत व्यापारी फेडरेशन आणि किराणा व्यापारी असोसिएशनने मिरची विक्री चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पनवेल येथील काही लोक स्कूल बस (व्हॅन)मधून मिरची घेण्यासाठी शनिवारी (दि. 9) कर्जतमध्ये आले आणि कर्जतकरांची एकच घबराट झाली. काही दक्ष कर्जतकरांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणल्यानंतर योग्य ती कारवाई …

Read More »

महाडमध्ये आढळला तिसरा कोरोनाबाधित

महाड, माणगाव : प्रतिनिधी महाड तालुक्यातील कोकरे तर्फे नाते येथील एका वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या 63 वर्षीय वृद्धाला पॅरेलिसिसच्या उपचारासाठी माणगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नव्या रुग्णामुळे महाडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण विविध आजारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी गेल्यानंतर …

Read More »

खालापुरात मद्य खरेदीसाठी आता आधार कार्डसक्ती; तालुक्याबाहेरील तळीरामांमुळे निर्णय

खोपोली : बातमीदार शासकीय कामासह अनेक ठिकाणी महत्त्वाचा ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणारे आधार कार्ड सध्या तळीरामांचा आधार बनले असून, खालापूर तालुक्यात बाहेरील तळीरामांचा वावर वाढल्याने मद्यविक्री दुकानदारांनी ‘आधार’सक्तीचा निर्णय घेतला आहे. कोरोनो विषाणूच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांची अन्न-पाण्यासाठी शिकस्त सुरू असताना दुसरीकडे मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांची तडफड सुरू होती. …

Read More »

पनवेलमध्ये 14 नवे कोरोनाग्रस्त; रायगड जिल्ह्यातील रुग्णसंख्या तब्बल 250च्या घरात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 10) कोरोनाचे 14 नवीन रुग्ण आढळले, तर 20 जणांनी कोरोनावर मात करून सुखरूपपणे घरी गेले आहेत. नव्या रुग्णांमध्ये शहरी भागातील खारघर येथील सहा, कामोठे पाच आणि पनवेल व कळंबोलीतील प्रत्येकी एक अशा 13 जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागात उमरोली येथे एका व्यक्तीला कोरोनाची …

Read More »

धक्कादायक! उरणमधील करंजात आढळले 21 रुग्ण

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि क्वारंटाइन केलेल्या 77 पैकी 21 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नवे रुग्ण चार कुटुंबांतील सदस्य असून, त्यात वृद्ध महिला-पुरुषांसह लहान मुलांचा समावेश आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. …

Read More »

पनवेल महानगरपालिका हद्दीतील इतर दुकानेही सुरू; सत्ताधारी भाजपच्या सूचनेची दखल

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत जीवनावश्यकखेरीज इतर दुकानेही सुरू करावीत, अशी सूचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान ही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असून, या वेळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील परिस्थिती …

Read More »

विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेस एकच जागा लढवण्यास राजी झाल्याने महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार असून, यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. संख्याबळ नसतानाही दोन जागा लढवण्याच्या …

Read More »

कळंबोली : प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांनी लॉकडाऊन काळात प्रभागातील 600 हुन अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली.

Read More »

पनवेल : भारत विकास परिषद या संस्थेच्या वतीने रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाला 30 पीपीई किट देणगी म्हणून देण्यात आली.

Read More »

लॉकडाऊनमुळे पीरवाडी किनारा सामसूम

उरण : वार्ताहर उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या पीरवाडी समुद्र किनारा एप्रिल व मे महिन्यात पर्यटकांनी फुलून जात असे. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या छोटया व्यवसाईक यांना उदरनिर्वाह साधन  होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यामुळे छोट्या टपरी धारकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या निसर्ग रम्य …

Read More »