Breaking News

Ramprahar News Team

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; विसरलेला ऐवज मालकाला केला परत

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरातून दररोज हजारो नागरिक आपले कुटुंब घेऊन मिळेल त्या वाहनाने व पायी प्रवास करून आपले गाव जवळ करीत आहेत. अशाच प्रकारे मूळचे म्हसळा येथील खरसई गावचे मेंदटकर कुटुंबीय नालासोपार्‍यातून गावी येताना इंदापूर येथील रिक्षाचालक सचिन बाबरे यांनी या कुटुंबाला मदत करून आपल्या रिक्षातून मूळ …

Read More »

खोपोलीतील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर; कंटेन्मेंट झोनही उठणार?

खोपोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार खोपोली शहरातील दुकाने व व्यापारी संकुले टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. कोरोनाबाबतचे नियम व सूचनांचे पालन होण्यासाठी नगरपालिकेकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. तसेच बाजार व अन्य ठिकाणी गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, खोपोलीत …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवू नका; प्रांताधिकार्‍यांचे आवाहन

माणगाव ः प्रतिनिधी संपूर्ण जगभरात हैदोस घालणार्‍या जीवघेण्या कोरोना विषाणूपासून अजूनपर्यंत माणगाव तालुका सुरक्षित असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे कळकळीचे आवाहन माणगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना दिघावकर म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी माणगावमधील एका खासगी रुग्णालयात महाड तालुक्यातील कोकरे गावातील  एका 63 वर्षीय वयोवृद्ध …

Read More »

अंबा नदी दूषित; परिसरातील पोल्ट्रीतील विष्ठा नदीपात्रात; ग्रामस्थ करणार जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

पाली ः प्रतिनिधी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगाव बुद्रुक हद्दीतील उंबरवाडी गावालगत असलेल्या अंबा नदीच्या बाजूला असलेल्या पोल्ट्रीतील विष्ठा पाण्यात मिसळत असल्याने पाणी दूषित झाले आहे. शिवाय नजीकच्या पोल्ट्रीतून नियमित मोटर लावून पाणीउपसा होत असल्याने पाण्याचा स्त्रोतही कमी झाल्याचा गंभीर आरोप उंबरवाडी ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी उंबरवाडी गावावर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे …

Read More »

राज्यात 11 जूनला मान्सूनची एण्ट्री; ‘स्कायमेट’चा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वैशाख महिन्याच्या मध्यावर मान्सूनचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. स्कायमेट संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतात केरळमध्ये 1 जूनला आणि 11 जूनला महाराष्ट्रात मुंबई, कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे. स्कायमेट संस्थेने पावसाळ्याचे वेळापत्रकच दिले आहे. त्यात संपूर्ण चार महिने पाऊस राहील, तर 8 ऑक्टोबर ही परतीच्या पावसाची …

Read More »

कर्जतमधील मिरची विक्री चार दिवस बंद

कर्जत : प्रतिनिधी कर्जत व्यापारी फेडरेशन आणि किराणा व्यापारी असोसिएशनने मिरची विक्री चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पनवेल येथील काही लोक स्कूल बस (व्हॅन)मधून मिरची घेण्यासाठी शनिवारी (दि. 9) कर्जतमध्ये आले आणि कर्जतकरांची एकच घबराट झाली. काही दक्ष कर्जतकरांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणल्यानंतर योग्य ती कारवाई …

Read More »

महाडमध्ये आढळला तिसरा कोरोनाबाधित

महाड, माणगाव : प्रतिनिधी महाड तालुक्यातील कोकरे तर्फे नाते येथील एका वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या 63 वर्षीय वृद्धाला पॅरेलिसिसच्या उपचारासाठी माणगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नव्या रुग्णामुळे महाडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण विविध आजारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी गेल्यानंतर …

Read More »

खालापुरात मद्य खरेदीसाठी आता आधार कार्डसक्ती; तालुक्याबाहेरील तळीरामांमुळे निर्णय

खोपोली : बातमीदार शासकीय कामासह अनेक ठिकाणी महत्त्वाचा ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणारे आधार कार्ड सध्या तळीरामांचा आधार बनले असून, खालापूर तालुक्यात बाहेरील तळीरामांचा वावर वाढल्याने मद्यविक्री दुकानदारांनी ‘आधार’सक्तीचा निर्णय घेतला आहे. कोरोनो विषाणूच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांची अन्न-पाण्यासाठी शिकस्त सुरू असताना दुसरीकडे मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांची तडफड सुरू होती. …

Read More »

पनवेलमध्ये 14 नवे कोरोनाग्रस्त; रायगड जिल्ह्यातील रुग्णसंख्या तब्बल 250च्या घरात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 10) कोरोनाचे 14 नवीन रुग्ण आढळले, तर 20 जणांनी कोरोनावर मात करून सुखरूपपणे घरी गेले आहेत. नव्या रुग्णांमध्ये शहरी भागातील खारघर येथील सहा, कामोठे पाच आणि पनवेल व कळंबोलीतील प्रत्येकी एक अशा 13 जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागात उमरोली येथे एका व्यक्तीला कोरोनाची …

Read More »

धक्कादायक! उरणमधील करंजात आढळले 21 रुग्ण

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि क्वारंटाइन केलेल्या 77 पैकी 21 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नवे रुग्ण चार कुटुंबांतील सदस्य असून, त्यात वृद्ध महिला-पुरुषांसह लहान मुलांचा समावेश आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. …

Read More »