Breaking News

Ramprahar News Team

पनवेलच्या वडाळे तलाव येथे दीपोत्सव साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळीनिमित्त दिव्यांची पूजा करून प्रार्थना केली जाते. यालाच अनुसरून शनिवारी (दि.11) पनवेलमध्ये दीपोत्सव साजरा झाला. या वेळी दिव्यांच्या लख्ख प्रकाशामुळे शहरातील वडाळे तलाव परिसर उजळून गेला होता. पनवेल महापालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने तिमिरातून तेजाकडे जाणारा दीपोत्सव साजरा झाला. या वेळी …

Read More »

भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मोठी ताकद दिली आहे. त्यानुसार 2024मधील महाविजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे या दृष्टीने सतत कार्यरत रहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.11) केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय …

Read More »

विवेकदीप उजळी

दिवाळीच्या निमित्ताने शहरे आणि महानगरांमधील व्यापारपेठा, मॉल लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आहेत. दिवाळीची मौजमजा करताना आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या वस्तीमध्ये दिव्यांचा लखलखाट असला तरी काही वस्त्या-पाड्यांवरील झोपड्यांमध्ये अजूनही अंधार बाकी आहे. आपल्या दारापाशी लागलेल्या आकाशकंदिलाचा उजेड तिथपर्यंत पोहचायला हवा. दारासमोरची एक इवलीशी पणती काळोखाला रोखून धरते, तिच्या …

Read More »

प्रामाणिक प्रयत्न सुरूच

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात उभे राहिलेले वादळ फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शमवू शकतात याबाबत एव्हाना सर्वांचीच खात्री पटलेली असेल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल याकरिता सरकारी यंत्रणा आता वेगाने कामाला लागली आहे. गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या प्रश्नी मराठा समाजाने मोर्चे, आंदोलने असे शांततापूर्ण मार्ग …

Read More »

‘रामप्रहर’चा सायबर क्राईमवर आधारित दिवाळी अंक जनजागृतीसाठी उपयुक्त ठरेल

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल ः रामप्रहर वृत्त वाढत्या सायबर क्राईम घटनांचा आढावा घेणारा व जनजागृतीपर ठरणारा दैनिक रामप्रहरचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) व्यक्त केला. ते दिवाळी अंक प्रकाशन समारंभात बोलत होते. रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या …

Read More »

केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त -आमदार प्रशांत ठाकूर

खारघर येथील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोमार्फत आयोजित ’भारत सरकार : नऊ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) झाले. या …

Read More »

पनवेल, उरण तालुक्यात शांततेत मतदान

थेट सरपंचांसह सदस्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात मुदत संपलेल्या 17 ग्रामपंचायतींसाठी तर उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. पनवेल व उरण तालुक्यात मतदान प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आता सोमवारी (दि. 6) मतमोजणी होणार असल्याने सर्वत्र उत्सुकता वाढली आहे. पनवेल तालुक्यातील …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप महायुतीचा देवदमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर यांचा रॅलीत सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवद ग्रामपंचायत येथे भाजप महायुतीच्या उमेदवारांचा मंगळवारी (दि. 31) प्रचार करण्यात आला. त्यास मतदारांचा प्रतिसाद लाभला. या निवडणुकीत भाजप …

Read More »

पनवेलमधील पाले खुर्द, ढोंगर्‍याचा पाडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील पाले खुर्द आणि ढोंगर्‍याच्या पाड्यात सुमारे तीन कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले. त्यामुळे तेथील नागरिकांना त्या त्या सुविधा मिळणार आहेत. पनवेल …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक

राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुंबई ः प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन बुधवारी (दि. …

Read More »