पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील पुष्पनारायण सोसायटीमध्ये काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हे काम जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्या शेष फंडाच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) करण्यात आले. या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेेंद्र पाटील, …
Read More »पाच दिवसांची कसोेटी
पाच दिवसांचा आठवडा केल्याने सरकारी आस्थापनांमधील खर्च कमी होईल. तसेच कामाचे तास वाढतील व त्यातून कार्यसंस्कृती मूळ धरेल अशी अपेक्षा सरकारातील काही नेतेमंडळींना वाटते. परंतु पाच दिवसांचा आठवडा करणे ही तात्पुरती मलमपट्टी ठरण्याची शक्यताच अधिक आहे. एका अर्थी सरकारी कर्मचार्यांचीही यातून कसोटीच लागणार आहे. केंद्रातील कर्मचार्यांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कार्यालयांनाही …
Read More »आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता
आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने श्रामशाळा सुरू केल्या. कोकणातही अशा आश्रमशाळा आहेत. एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण मार्फत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 16 आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. ज्यात सुमारे 5 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या आश्रम शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या सुरकक्षेबात फार गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी घटना …
Read More »रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप
पेण : प्रतिनिधी शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये पेण नगर परिषद हद्दीतील घरकुल मंजूर केलेले लाभार्थी कैलास जनार्दन जाधव व सुनिल हरिश्चंद्र पंते यांना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते एक लाख 25 हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मुख्याधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरूद्ध पाटील, सभापती दर्शन …
Read More »खालापुरात शिक्षकाला बेदम मारहाण; अज्ञात चौघांविरोधात अॅेट्रॉसिटीचा गुन्हा
खोपोली : प्रतिनिधी नेहमी नाटक करत असतो याच्या शाळेला लॉक लावा, असे धमकावत खालापूर तालुक्यातील खरसुंडी शाळेतील शिक्षक रमेश नामदेव देवरूखकर (वय37, रा. निळजे डोंबविली) यांना जातीवाचक शिविगाळ करून चार जणांनी शाळेतच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. खरसुंडी येथील दत्तात्रय शिवराम जाधव माध्यमिक शाळेत रमेश शिक्षक आहे. सोमवारी शाळा …
Read More »विद्यार्थ्यांच्या आहारात गोमाशी प्राथमिक शाळेच्या परसबागेतील भाज्या
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील गोमाशी गावातील प्राथमिक शाळेत परसबाग उपक्रम राबविण्यात आला आहे. या परसबागेतील विविध भाज्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरल्या जातात. तसेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांना त्यांची नावे दिली असून, या झाडांचे संगोपन विद्यार्थी करत आहेत. ही झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली आहेत. विद्यार्थी व गोमाशी शाळा व्यवस्थापन …
Read More »जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड; रस्ते विकास महामंडळाचा प्रताप; ‘काम बंद’चे आदेश
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील कि मी.42 जवळ होर्डिंग, बोर्ड लावण्यासाठी कुठल्याही खात्याची परवानगी न घेता वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार खोपोलीतील पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. खुद्द महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वृक्षतोड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार …
Read More »खोपोलीत थांबली रस्त्यांची कामे; निधी मंजूर असूनही नगर परिषद प्रशासनाचा कानाडोळा
खोपोली : प्रतिनिधी शहरातील शास्त्रीनगर भागामधील रस्त्यांच्या कामांना मागील महिन्यात सुरुवात करण्यात आली, त्यावेळी टप्याटप्याने शहरातील सर्वच रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण होईल, असे खोपोली नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र येथील एकाच रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर यंत्रणा गायब झाली. त्यामुळे या भागातील अन्य रस्त्यांचे काय? शहरातील अन्य रस्त्यांची कामे होणार …
Read More »बालसंस्कार विद्यामंदिरने ठेवला वेगळा आदर्श -महेश शिंदे
महाड : प्रतिनिधी आजच्या युगात शिक्षण हा व्यवसाय झाला असून, या बाजारात बाल संस्कार विद्या मंदिर या संस्थेने कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा वेगळा आदर्श जगासमोर ठेवला असल्याचे मत पत्रकार महेश शिंदे यांनी मंगळवार (दि. 11) येथे व्यक्त केले. महाड तालुक्यातील कोकरे येथील बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेतील …
Read More »खारपाडा येथे स्वच्छता अभियान
पेण : प्रतिनिधी सीएफआय, बीएनवाय व एम्पॉवर तसेच खारपाडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा गावात नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी एकूण 49 किलो प्लास्टिक गोळा करून गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करण्यात आली. आयबीएनच्या चेअरपर्सन हेगे मॅग्नुस्सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमिला स्कॅरे, छायाचित्रकार हल्लवर जोहोन्सन, सीएफआयचे मुख्यकार्यकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper