पनवेल : प्रतिनिधी तळोजा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा आरोप करून बेपत्ता झालेली खारघरमधील अल्पवयीन मुलगी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाली होती. ती मुलगी आपल्या मित्राबरोबर देहरादून येथे सापडली असून तिच्या मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून कोर्टाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे. पीडित मुलीच्या वाढदिवसावेळी …
Read More »दैनिक बित्तंबातमीचा प्रकाशन सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त दैनिक बित्तंबातमी रायगड आवृत्तीचा प्रकाश समारंभ शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी पाच वाजता पनवेल मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या दैनिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रमुख उपस्थिती आमदार …
Read More »12व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
पनवेल : बातमीदार कळंबोली सेक्टर 11मध्ये रहाणार्या 19 वर्षीय कॉलेजवयीन तरुणीने खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. गुरुशरणजीत कौर जोगासिंग भुल्लर (19) असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त …
Read More »ज्येष्ठ नागरिक कायदा ठरतोय निरुपयोगी
लवकरच मुलांच्या परीक्षा संपतील, मग पुढचा कालावधी म्हणजे सुटीची मजा घेण्याचे महिने. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरुण पिढीला अडचण वाटू लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढील तीन महिने घडतात. त्यांची वृद्धाश्रमात सोय करणे आर्थिकदृष्ट्या शक्य असतानाही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका …
Read More »महागाईची चेटकीण
सरकारी प्रयत्नांमुळे काही प्रमाणात ग्राहकोपयोगी खाद्य जिन्नसांचे भाव काहिसे उतरले असले तरीही परिस्थिती आवाक्याच्या बाहेरचीच आहे. अन्न धान्या व खाद्य पदार्थांचे भाव लवकरात लवकरात लवकर अणखी खाली आणाणे नितांत गरजेचे असून केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात तातडीने पावले उचलायाला हवीत. या महागाईमुळे शहरी भागांमध्ये जीवनमान मेटकुटीला आलेले दिसत असताना …
Read More »पेण : अॅड. महेश मोहिते यांची भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते अनिल डेरे, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, शहराध्यक्ष हिमांशु कोठारी आदी. (छाया : अनिय मनियार)
Read More »पेणमध्ये शिक्षकांसाठी ‘निष्ठा’ प्रशिक्षण
पेण : प्रतिनिधी डाएट – पनवेल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग – पेण यांच्या संयुक्त विद्यामाने मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी पेणमध्ये निष्ठा प्रशिक्षण सुरू असून आत्तापर्यंत प्रत्येकी पाच दिवसांचे दोन टप्पे संपन्न झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) आणि एनसीईआरटी (दिल्ली) यांच्यामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचे आणखी …
Read More »नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल -नायब तहसीलदार भालेराव
कर्जत : प्रतिनिधी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन स्वास्थ ही महत्वाची चतुसुत्री चालकांनी ध्यानात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी येथे केले. राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 25जानेवारी या कालावधीत प्रवासी सुरक्षा अभियान राबविण्यात …
Read More »ध्वजसंहिता, ध्वजारोहणाबाबत कार्यशाळा
म्हसळा : प्रतिनिधी येथील सार्वजनिक वाचनालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त वतीने केंद्र प्रमुख, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये ध्वजारोहणाचे प्रात्यक्षिक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक राजेंद्र मालुसरे यांनी उपस्थिताना ध्वजाचे प्रमाणित आकार, लावण्याची पध्दत, शाळांमधून ध्वजारोहण, ध्वजवंदन, ध्वजासमोरील …
Read More »इंधनाची बचत करणार्या मुरूड आगाराला पारितोषिक
मुरूड : प्रतिनिधी इंधन बचत केल्याबद्दल पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, तेल व प्राकृतिक गॅस मंत्रालय यांच्या तर्फे मुरुड एसटी आगाराला 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि. 16) होणार्या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे व त्यांच्या सहकार्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper