पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या वतीने मोफत जयपूर फूट कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यातील 70 लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान …
Read More »शहरांप्रमाणे गावांचाही विकास होणार; सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही, रोडपाली, खिडूकपाड्यातील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवभारत घडविण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. येत्या काळात शहरांप्रमाणे गावांचाही नियोजनबद्ध विकास होणार आहे. ग्रामीण भागात येत्या काळात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही सिडको अध्यक्ष तथा भाजप …
Read More »पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे (उरण) येथील तु. ह. वाजेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप घोडके यांना राष्ट्रीय पातळीवरील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रा. डॉ. घोडके यांचे रविवारी अभिनंदन केले.
Read More »खेडमध्ये संतप्त प्रवाशांकडून रेल्वेगाडीची तोडफोड
खेड : मुंबईकडे परतण्यासाठी खेड स्थानकात उभ्या असलेल्या संतप्त प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने रत्नागिरी-एलटीटी एक्स्प्रेसच्या एसी कोचची रविवारी (दि. 8) तोडफोड केली. गौरी-गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे परतण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या संख्येने खेड स्थानकात गर्दी केली होती. मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकावर थांबवण्यात आली, मात्र ही गाडी प्रवाशांनी भरलेली होती. या एक्स्प्रेसमध्ये खेडमधील प्रवाशांना …
Read More »ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि. 8) निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र व …
Read More »जासईत तरुणीची आत्महत्या
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जासई येथील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 7) घडली. शिवानी अरुण म्हात्रे (20) असे या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, इयत्ता बारावीत शिकत असलेल्या शिवानी म्हात्रे हिने शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि तरुणीचे पार्थिव …
Read More »मुसळधार पावसाचे गडचिरोलीत थैमान; 300 गावांचा संपर्क तुटला; तिघे वाहून गेले
गडचिरोली : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक मार्ग बंद पडून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान-मोठे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख …
Read More »चांद्रयान-2; विक्रम लँडरचे ठिकाण सापडले
बंगळुरू : वृत्तसंस्था चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) यश आले आहे. ‘चंद्रावरील विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून, ऑर्बिटरने या लँडरचे फोटो काढले आहेत. आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करीत आहोत’, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान-2 …
Read More »पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; मुंबईत मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन
मुंबई : प्रतिनिधी आजच्या घडीला देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या शहरांची निर्मितीही 21व्या शतकातील जगाप्रमाणे करावी लागणार आहे. याच विचारासह आपले सरकार पुढील पाच वर्षांत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 7) येथे दिली. …
Read More »भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेला धक्का; लँडरचा संपर्क तुटला
बंगळुरू ः भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला आहे. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर पोहोचलेल्या विक्रम लँडरचा संपर्क शनिवारी (दि. 7) मध्यरात्री दोनच्या सुमारास तुटला. रात्री एक वाजून 45 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. या वेळी संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. इस्रो सेंटरमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper