Breaking News

Ramprahar News Team

उमटे धरणातून 60 गावांना होतोय अशुद्ध पाणीपुरवठा; जि. प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची कबुली

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून मातीमिश्रित अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची कबुली रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी शुक्रवारी (दि. 6) पत्रकार परिषदेत दिली. उमटे धरणातून मातीमिश्रित अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली. रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम …

Read More »

वंचित बहुजन आघाडीत फूट; एमआयएम स्वबळावर लढणार

मुंबई ः रामप्रहर वृत्त वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे या पक्षांत काडीमोड होण्याची शक्यता आहे.

Read More »

लाभार्थींना उद्या मिळणार जयपूर फूट

पनवेल ः रामप्रपहर वृत्त सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत जयपूर फूट कॅम्पमधील लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. पनवेल शहरातील …

Read More »

आली गौराई अंगणी… आज गणरायांसह गौरीचे विसर्जन

पनवेल ः बातमीदार ज्येष्ठ व कनिष्ठा गौरीचे पनवेल परिसरात शुक्रवारी (दि. 7) घरोघरी पूजन झाले. गौरी पूजनाचा कार्यक्रम तीन दिवस चालतो. गौराईच्या आगमनामुळे सुहासिनी माहेरी आल्याने उत्साहाला उधाण आले आहे. भाद्रपदातील शुक्ल पक्षात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन असते म्हणून तिला ज्येष्ठागौरी म्हणतात. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन म्हणजे दुसर्‍या …

Read More »

असंरक्षित किल्ल्यांचा विकास; सरकारचे स्पष्टीकरण; शिवरायांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही

मुंबई : प्रतिनिधी लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातील गडकिल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढावी, यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली होती, मात्र किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. …

Read More »

खैरात वाटणं थांबवा, केजरीवाल सरकारला फटकारले

नवी दिल्ली : महिलांना मेट्रोमध्ये फुकट प्रवास देण्याची घोषणा करणार्‍या दिल्लीतील केजरीवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे. फुकट प्रवासाची सुविधा दिल्यास दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. जनतेच्या पैशाची अशा पद्धतीने दिल्ली सरकारने उधळपट्टी करू नये, असे सांगतानाच दिल्ली सरकारकडून होणारी खैरात आम्ही रोखू शकतो. …

Read More »

महाडमधील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी व पुरामुळे महाड तालुक्यात झालेल्या नुकसानीची शुक्रवारी (दि. 30) केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. या पथकाने महाड शहर, वरंध घाट व शेवते येथे पाहणी केली. महाड शहरासह औद्योगिक क्षेत्र, तसेच शहराजवळील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी झाली. व्यापार्‍यांची दुकाने आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरून साहित्याचे …

Read More »

सुधागडात जुगार अड्ड्यावर धाड ; 57 जण ताब्यात, सव्वासहा लाखांचा ऐवज जप्त

पाली : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या तोंडावर सुधागड तालुक्यातील वाफेघर या गावात जुगाराच्या अड्ड्यावर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ व पाली पोलिसांनी शुक्रवारी (दि. 30) पहाटे 4 वाजता धाड टाकली. या कारवाईत 57 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडील रोख रकमेसह सव्वासहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. …

Read More »

खोपोलीत काँग्रेसला खिंडार; आजी-माजी नगरसेवक, शहराध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सिलसिला सुरूच असून, खोपोलीतील काँग्रेसचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युअल, नगरसेविका जिनी सॅम्युअल, माजी नगरसेवक महादू जाधव, मधुकर दळवी, शहराध्यक्ष संतोष खुरपुडे यांच्यासह कार्यकर्ते 1 सप्टेंबर रोजी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार …

Read More »

तिघर शाळेतील मुलांचे नाव मंगळावर झळकणार; ‘नासा’च्या उपक्रमात अनोखा सहभाग

कर्जत : बातमीदार नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै 2020मध्ये प्रस्तावित आहे. हे यान रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील तिघर शाळेतील विद्यार्थ्यांची नावे सोबत घेऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील प्रक्षेपण केंद्रातून मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. मानवाचे पाऊल मंगळ ग्रहावर पडण्याअगोदर आपले नाव मंगळावर पाठविण्याची संधी नासा या …

Read More »