Breaking News

Ramprahar News Team

उसर्ली (ता. पनवेल) : नैना क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची ग्रामस्थांच्या मागणीनुसार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली व अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी सिडको अधिकारी रवींद्र कुलकर्णी, सतीश मोर्या, उसर्लीचे उपसरपंच गणेश भगत, विचुंबेचे उपसरपंच किशोर सुरते, मच्छिंद्र पाटील, विजय भगत, जयवंत भगत, संजय …

Read More »

प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरण; पोलीस अधिकारी, कर्मचार्यांवर गुन्हा

अलिबाग : प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीची दाखल देऊन राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्षातील सहा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एडीसी श्रीमती अलकनूर, प्रशांत लांगी, स. आ. …

Read More »

श्रीरामपूरमध्ये ‘रयत’च्या शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण

नगर : रामप्रहर वृत्त श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संकुलांतर्गत विविध इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा शुक्रवारी (दि. 30) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

Read More »

नव्या भारतात आडनावाला महत्त्व नाही : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : हा नवा भारत आहे. येथे आडनावाला महत्त्व नाही, तर तुमच्यात तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काय क्षमता आहे याला महत्त्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी देशवासीयांशी संवाद साधत …

Read More »

इंग्लंडला धक्का, अ‍ॅशेस मालिकेतून अँडरसन ‘आऊट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अ‍ॅशेस मालिकेत 1-1 बरोबरी साधल्यानंतरही इंग्लंडच्या संघासमोरची विघ्न कमी होताना दिसत नाहीयेत. इंग्लंडचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, याच सामन्यात अँडरसनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो सामना मध्यावर सोडून ड्रेसिंग रुममध्ये …

Read More »

दोन वर्षांनंतर झळकाविलेले शतक विशेष -अजिंक्य रहाणे

जमैका : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दुसर्‍या डावात शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जमैकाच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये दुसर्‍या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी रहाणेने पत्रकारांशी संवाद साधला. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर झळकावलेले शतक आपल्यासाठी …

Read More »

प्रभात कोळीचा सन्मान; तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे सुपुत्र मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव, तर नितीन कीर्तने यांना टेनिसमधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 29) प्रदान करण्यात आला. जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाच्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण …

Read More »

‘आरटीपीएस’ची कुस्ती स्पर्धेत ‘ताकद’

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकतीच नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे हायस्कूलच्या प्रांगणात झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली ताकद दाखवून दिली. कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारात कल्पेश चौधरी (इयत्ता बारावी), अबुझार मुल्ला (दहावी), …

Read More »

ईलाव्हेनिलचा ‘सुवर्ण’वेध!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताची उदयोन्मुख नेमबाज ईलाव्हेनिल व्हालारिव्हन हिने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेचे स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली आहे. 20 वर्षीय ईलाव्हेनिलने 251.7 इतके गुण कमावले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोश (250.6) आणि चायनीज तैपईच्या यिंग लिन …

Read More »

अभिषेक वर्माचा ‘सुवर्ण’वेध; नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सौरभलाही कांस्यपदक

रिओ दी जनेरो : वृत्तसंस्था ब्राझीलच्या रिओ दी जनेरो शहरात सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्ण, तर सौरभ चौधरीने कांस्यपदक पटकाविले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने 244.2, तर सौरभ चौधरीने 221.9 गुणांची कमाई केली. तुर्कीच्या इस्माईल …

Read More »