पेण : प्रतिनिधी खोपोलीकडून पेणकडे येणार्या एसटी बसला गागोदेजवळ समोरून येणार्या टँकरने धडक दिल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू, तर चालक-वाहकासह 42 जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास घडला. खोपोलीहून एसटी बस (एमएच 20-बीएल 0547) पेणकडे येत होती. ही बस गागोदेजवळील वळणावर आली असता तिला समोरून …
Read More »ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलचे दोन डबे घसरले
नवी मुंबई : ठाणे-वाशीदरम्यान ऐरोलीजवळ रविवारी (दि. 11) लोकलचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने लोकलमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे रविवारी सायंकाळी ऐरोलीजवळ गणपती पाडा येथे रुळावरून घसरले. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन …
Read More »विराट बनला ‘हेल्थ गुरू’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेससाठी किती जागरूक असतो हे सर्वांना माहीत आहे. फिटनेससाठी तो खास डाएट प्लानही फॉलो करतो. अनेक मुलाखतींमध्ये विराटने आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडले आहे. असाच एक व्यायाम करतानाचा व्हिडीओ विराटने नुकताच ट्विट केला आहे. या व्हिडीओत त्याने फिटनेस फंडा सांगितला …
Read More »विराटकडून बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण
मुंबई : प्रतिनिधी गेल्या महिन्यापासून सोशल मीडियावर बॉटल कॅप चॅलेंजची खूप चर्चा आहे. सर्वसामान्य लोक आणि अनेक कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही हे चॅलेंज पूर्ण करीत त्याचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत विराटने हातातील बॅटने रिव्हर्स शॉट …
Read More »तमिळ थलायव्हाजचा गुजरातवर विजय
अहमदाबाद : वृत्तसंस्था अजय ठाकूर याने केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर तमिल थलायव्हाजने प्रो कबड्डी लीगच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्सला 34-28 असे पराभूत केले. अजय याने नऊ गुण मिळवले, तर मोहित छिल्लरने शानदार बचाव केला. गुजरातच्या सुनील कुमार याने पाच गुण मिळवले, मात्र तो अखेरच्या क्षणी तमिळ थलैवाजला विजयापासून रोखू शकला …
Read More »भारतीय तिरंदाजी ; संघटनेवरील बंदी तात्पुरती -महासंघ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्याने निवडणुका घेऊन आचारसंहितेप्रमाणे नवी कार्यकारिणी स्थापन केल्यास या महिन्याच्या अखेरीस भारतीय तिरंदाजी संघटनेवरील बंदी उठवण्याची जागतिक तिरंदाजी महासंघाची इच्छा आहे. महासंघाने बंदी घातल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील निवडणुका होईपर्यंत पाच सदस्यीय हंगामी समिती नेमण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाला दिले आहेत. त्याच्या एक दिवसानंतरच जागतिक महासंघाने ही …
Read More »आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धा : पाकला नमवून भारत अंतिम फेरीत
रंगून : वृत्तसंस्था भारताच्या 23 वर्षांखालील संघाने म्यानमार येथे सुरू असलेल्या आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर 21-25, 25-16, 25-22, 25-18 असा विजय मिळवला. त्यासोबतच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. यासह भारताने 23 वर्षांआतील गटाच्या व्हॉलिबॉल विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पहिला …
Read More »जय बजरंग! ; तबिलिसी ग्रांपीत सुवर्णपदक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करीत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रांपीमध्ये सुवर्णपदक पटकाविले, तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रां.पी.मध्ये गेल्या वर्षी सुवर्णपदक जिंकणार्या बजरंग याने पुरुषांच्या फ्री स्टाईल …
Read More »पनवेलमध्ये मान्सून कप फुटबॉल स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त डी कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानात मान्सून कप फुटबॉल स्पर्धा 17 व 18 रोजी आयोजित करण्यात आली आहे. पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने व रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या सहकार्याने होणार्या या स्पर्धेत …
Read More »अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; रायगडात 18 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत; बळीराजा हवालदिल
अलिबाग : प्रतिनिधी अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 1116 गावांमधील 18 हजार 595 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला, आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. सुमारे 20 टक्के कृषिक्षेत्र बाधित झाले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा एक लाख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper