महाड पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन महाड : प्रतिनिधी तालुक्यातील अपंगांना शासकिय निधी व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पाठपुरावा सुरू असून त्यांना त्यांचा लाभ मिळत नसल्याने प्रहार संघटनेतील दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी (दि. 20) महाड पंचायत समितीवर आंदोलन करत बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त …
Read More »खालापूरात काही शिवभोजन केंद्र नामधारी
तपासणीची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी गरीब व कष्टकर्यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली खरी, मात्र काही केंद्राचा अपवाद वगळता अनेक केंद्रात थाळी रिकामी असूनही, केंद्र चालकांचे पोट मात्र भरत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रांच्या तपासणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्य …
Read More »रोहेकर लोकलच्या प्रतीक्षेत
जलद गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय रोहे : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील रोहे हे महत्त्वाचे व तालुक्याचे ठिकाण आहे. मध्य रेल्वेने या स्थानकापर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण केले आहे. मात्र या रेल्वे मार्गावर अद्याप लोकल चालू करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे रोहे स्थानकात जलद गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांचा पुर्ण भार …
Read More »दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या शिक्षक आरोपीला आजन्म कारावास
माणगांव कोर्टाचा निकाल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील फलाणी येथील प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये दोन अल्पवयिन विद्यार्थिनींवर अत्याचार व अनैसर्गिक अत्याचाराचे अमानुष कृत्य करणार्या नित्यानंद धोंडू पाटील या नराधमास माणगाव येथील अतिरीक्त सत्र जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (दि. 19) आजन्म (मरेपर्यंत) कारावासाची शिक्षा सूनावली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी यांची पीडित मुलगी व …
Read More »माथेरानच्या शार्लोट लेकच्या संवर्धनाला सुरुवात
तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ कर्जत : बातमीदार ब्रिटिश कालीन शार्लोट लेकचे पाणी माथेरानसाठी जीवनवाहिनी समजले जाते. नगर परिषदेने या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शार्लोट लेकची पाणी साठवण क्षमता क्षमता वाढणार आहे. या कामासाठी नगर परिषदने सव्वा सात लाखाचा निधी मंजूर केला आहे. माथेरान नगर …
Read More »कोकणातील मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात
रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 कि.मी.लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी उद्ध्वत होताना दिसतोय. इथली मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळे मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सततच्या वाढत्या कर्जाने आत्महत्या करण्याची नामुष्की देखील ओढवण्याची …
Read More »मोरा जेट्टीच्या शौचालयाची दुरवस्था
प्रवाशांची गैरसोय; लक्ष देण्याची मेरी टाईम बोर्डाकडे मागणी उरण : प्रतिनिधी उरण येथील मोरा जेट्टीच्या शौचालयाची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, मात्र त्याकडे मेरी टाईम बोर्डचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशामध्ये वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. मेरीटाइम बोर्डने या समस्यानकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी विशेष करून महिला …
Read More »कामोठेमध्ये डस्टबीनचे वाटप
परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त युवकांचे प्रेरणास्थान आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 18) पनवेलमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबण्यात आले. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या नगरसेवक निधीमधून डस्टबीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 10 आणि 19 मध्ये …
Read More »आमदार महेश बालदीं पाठपुराव्याला यश
लोहोप गावासाठी मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे लोहोप गावासाठी आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. उरण मतदार संघात व खालापूर तालुक्यात असणार्या लोहोप गावात येथील आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून पसरणार्या …
Read More »नवी मुंबईत तांदूळ व आंबा महोत्सव
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव 20, 21 आणि 22 मे रोजी पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन शैक्षणिक संकुल (सेक्टर-18, नेरूळ) येथे आयोजित केला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्याच्या विविध जाती, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper