दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला. या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, मात्र विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही स्थान मिळवता आलेले नाही. पुरुषांच्या कसोटी संघात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याआधी, आयसीसीच्या …
Read More »जोहे हद्दीत भव्य मैदानाचे वैकुंठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
रविशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून 40 लाखांचा निधी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील जोहे, कळवे, दादर, रावे आजूबाजूच्या गावांमध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या विभागात मैदानाची उणीव भासत, जाणवत होती. यामुळे आमदार रविशेठ पाटील यांनी मैदानासाठी चाचपणी करून शासनाच्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करीत गुरुवारी (दि. 20) जोहे …
Read More »हरियाणाची पुण्यावर मात; तर तेलुगू टायटन्सने नोंदवला पहिला विजय!
प्रो कबड्डी लीग बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 37-30 असा पराभव केला. हरयाणा स्टीलर्सचा हा चौथा विजय आहे, तर अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील पुणे संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. हरियाणा स्टीलर्सच्या जयदीप आणि मोहितने उत्कृष्ट कामगिरी करीत हाय-5 पूर्ण केले. दोघांनी टॅकलद्वारे …
Read More »पहिल्या वनडेत भारताचा पराभव
द. आफ्रिकेची विजयी सलामी; आज दुसरी लढत पर्ल ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर 31 धावांनी पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. शिखर धवन (84 चेंडूंत 79 धावा), विराट कोहली (51) आणि शार्दूल ठाकूर (नाबाद 50) या तिघांनी अर्धशतके झळकावूनही मधल्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीचा भारताला फटका बसला. सामनावीर रासी व्हॅन …
Read More »विकास हाच उपाय
ऑक्सफॅम ही जागतिक संस्था दरवर्षी जगाच्या आर्थिक वाटचालीचा अहवाल सादर करते. अनेक वर्षे ही संस्था जगभरातील वाढत्या विषमतेकडे आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाकडे लक्ष वेधत आली आहे. यंदाही संस्थेचा संबंधित जागतिक अहवाल प्रसृत झाला. त्यात गेली दोन वर्षे कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या जगात गरीब-श्रीमंतांमधील दरी कशी रूंदावली याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. देशात …
Read More »कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची स्वागत कमान गायब
सरकार दफ्तरी मात्र कमान हटविल्याची नोंदच नाही कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले, तेव्हा प्रवेशद्वारावर असलेली लोखंडी कमान हटविण्यात आली. त्या कमानीचे पुढे काय झाले, याबाबत माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत काढलेल्या या स्वागत कमानीची नोंदच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर …
Read More »नेरळ-माथेरान रेल्वे मार्गालगत वृक्षलागवड
लावलेल्या 25 हजार झाडांना संरक्षण कर्जत : बातमीदार वणवे रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कृषिरत्न शेखर भडसावळे यांच्या सगुणा रुरल फाउंडेशनवर नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गाच्या बाजूला झाडे लावण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार फाउंडेशन एकूण 25 हजार झाडे लावली. त्यांचे संरक्षण होण्यासाठी या झाडांभोवती संरक्षण करणारे कागद लावण्यात आले आहेत. नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे मार्गाच्या …
Read More »श्रीवर्धन तालुक्यात पोषण आहाराचा भेसळयुक्त कारभार
श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील अंगणवाडी तर्फे गरोदर माता व मुलांना भेसळयुक्त निःकृष्ठ दर्जाच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यामुळे महिला व बालविकास कल्याण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने गरोदर माता व लहान मुलांना आंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. परंतु श्रीवर्धन तालुक्यातील …
Read More »आदिवासींच्या जमिनीवर धनदांडग्याचा डोळा
कवडीमोल भावाने जमिनी लाटण्याच्या प्रकारात वाढ पाली : प्रतिनिधी आपल्या उंबरे गावानजीक असलेल्या जमिनीवर एका धनिकाने अतिक्रमण करून जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम असून सबंधित व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार जनी गौरू पवार यांनी खालापूर तहसीलदार व पोलीस ठाण्यात केली आहे. पाली-खोपोली मार्गालगत उंबरे गावाजवळ …
Read More »रस्ते खोदणार्यांकडून दंड वसुली करा
माथेरान भाजपची मागणी माथेरान : रामप्रहर वृत्त येथील रस्ते क्ले पेव्हर ब्लॉकने केले जात आहेत मात्र माथेरान जल प्राधिकरण किंवा काही लोक हे रस्ते खोदून जलवाहिनी टाकत आहेत. या रस्ते खोदणार्यांकडून दंड वसुली करावी, अशी मागणी माथेरान भारतीय जनता पक्षाने मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे केली आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper