पनवेल : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. (टीआयपीएल) यांच्या पुढाकाराने व अष्टविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून टीआयपीएल पाडेघर येथे शनिवारी (दि. 22) कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटल येथील डॉ. बाळाजी ग्यानराव (बीएचएलएस), डॉ. श्री सागर तांडेल (डीएम कार्डिओलॉजीस्ट), डॉ. श्री प्रशांत …
Read More »सुरक्षेतील तृटींविरोधात व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ कामोठ्यात स्वाक्षरी मोहीम
कामोठे : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाबमध्ये प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत ज्या राज्यात त्यांचा दौरा होता त्या पंजाबमधील काँग्रेस सरकारने बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली. त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करुन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहोत या साठी कामोठे भाजपच्या …
Read More »प्रा. एन. डी. पाटील यांना आदरांजली
कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे 17 जानेवारीला निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्याकरीता कामोठे येथील ‘रयत’च्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शोकसभेचे आयोजन शनिवारी (दि. 21) करण्यात आले होते. या शोकसभेत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एन. डी. पाटील …
Read More »‘मविआ’चे मंत्रिमंडळ बरखास्त करा
शपथेचा भंग केल्याप्रकरणी भाजपची मागणी; राज्यपाल कोश्यारींना निवेदन मुंबई : प्रतिनिधी अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे व मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी …
Read More »टाटा रुग्णालयात प्रोटॉन थेरपीची चाचणी
खारघर : प्रतिनिधी कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रोटॉन थेरपीच्या दुसर्या उपचार कक्षाची प्रोटोकॉल चाचणी शुक्रवारी (दि.21) रोजी यशस्वी झाली. लवकरच संबंधित कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याने शेकडो रुग्णांना या अद्ययावत उपचार पद्धतीचा लाभ होणार …
Read More »मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी वाचन करणे गरजेचे -डॉ. कळमकर
पनवेल : प्रतिनिधी भाषा ही लवचिक असून, भाषा भावना व्यक्त करणारी असते, पण आता इमोजी वापरले जातात. प्राचीन काळातील लोक जशी चिन्हाची भाषा वापरत होते, तसे आपण पुन्हा मागे जातो की काय असे वातावरण तयार होऊ लागले आहे. मराठी भाषा वृध्दीगंत करायची असेल तर वाचन केले पाहिजे वाचनालयातील पुस्तके वाचकांची …
Read More »उरणमध्ये डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्याच्या विल्हेवाटसाठी प्रकल्प
उरण : वार्ताहर उरण शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण नगर पालिकेने बायो मायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि पालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आले. बोरी पाखाडी येथिल डम्पिंग ग्राउंडवर सुरू झालेल्या या प्रकल्पात 2007 पासून साठलेल्या कचर्याचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे …
Read More »मोबाइल चोरी, फसवणुकीच्या घटनांत वाढ
पनवेल, उरण, नवी मुंबईत सराईत चोर अटकेत पनवेल : वार्ताहर पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरात चोरीच्या व फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज एक ते दोन प्रकार समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत सराईत चोरांनी दहशत माजवली आहे. नागरिकांना लुटणे, मोबाइल चोरणे, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. …
Read More »पटोले, कसे पटवले?
नाना पटोले यांनी दावा केलेल्या मोदी नावाच्या कथित गावगुंडाला नागपूरमध्ये एका वकिलाने प्रसारमाध्यमांसमोर उभे केले खरे, परंतु माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देताना या कथित गुंडाची बोबडी वळली. पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच आहोत असा दावा त्याने केला असला तरी, मोदींसंदर्भात पटोलेंनी केलेली दर्पोक्ती अंगलट येऊ लागल्याने उगाचच कुणाला तरी …
Read More »पालीत संकष्ट चतुर्थीला फुलला भक्तीचा मळा
ट्रस्टचे चांगले नियोजन, व्यवसायिकांचा धंदा तेजीत पाली : प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त व अष्टविनायकांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी (दि. 21) संकष्टी चतुर्थीला पालीत भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. कोविडच्या तिसर्या लाटेत देखील कोरोना नियमांचे पालन करीत भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शन घेताना दिसून आले. दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper