Breaking News

Ramprahar Team

मुंबई-पुणे महामार्गावर कारला अपघात

पाच जण गंभीर जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ, पुणे दिशेच्या लेनवर पुढे जाणार्‍या टँकरला मागून सीलेरिया कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले. जखमीत एका महिलेचा समावेश आहे. सर्व जखमींना लोकमान्य पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून पुणेकडे …

Read More »

सुधागड तहसील कार्यालयात महिलांना सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन

पाली : प्रतिनिधी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिसांकडून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार वैशाली काकडे, महिला पोलीस कर्मचारी मनीषा लांगी, रेखा म्हात्रे, स्वप्नाली म्हात्रे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणावर प्रत्येक विभागात भर दिला जातोय. महिला सुरक्षेसंदर्भात …

Read More »

ग्रीन हायवेसाठी त्रुटी दूर करणे आवश्यक

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग 548अ हा ग्रीन हायवे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्या रस्त्याबाबत अनेक त्रुटी असून त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीबाबत अजूनही स्थानिक बाधित शेतकरी चिंतेत आहे. राष्ट्रीय महामार्ग 548अ हा कर्जत तालुक्यातून जात असून नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर …

Read More »

धाटाव ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव येथील ग्रामस्थांनी शनिवारी (दि.1) ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय ‘जबाब दो‘ धरणे आंदोलन केले. अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. धाटाव ग्रामपंचायतीच्या 14 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रलंबित प्रश्नावर चर्चा न करता सरपंच व सचिव (ग्रामसेवक) यांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच …

Read More »

पनवेल महापालिकेच्या भरारी पथकांची जोरदार कारवाई

पाच लाख 34 हजार 700 रुपयांचा दंड वसूल पनवेल : प्रतिनिधी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमांबरोबरच विनामास्क फिरणार्‍या आणि रात्री 9 नंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर, कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान चारही प्रभागांमधून गेल्या तीन दिवसांमध्ये पाच लाख 34 हजार 700 …

Read More »

नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत आणि माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नागरिकांना नववर्षाची भेट म्हणून 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1 जानेवारी) प्रकाशन झाले. …

Read More »

विहिघरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विहिघर येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायणाची महापूजा, तसेच चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांच्या वाढदिवस समारंभानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 1) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमांदरम्यान सकाळी 8 …

Read More »

कोरोनाच्या नियमांत सरत्या वर्षाला निरोप

रायगडकरांनी केले 2022चे उत्साहात स्वागत अलिबाग : प्रतिनिधी 2021चे स्वागत जोरात करता आले नाही, त्यामुळे 2022च्या स्वागताची तयारी करणार्‍या रायगडकरांच्या नियोजनावर अखेर पाणी पडले. कोरोनाच्या ओमायक्रॉनने विळखा घट्ट केल्याने नियमांचे बंधन आले परिणामी रायगडकर आणि मुंबई-पुण्यातील पर्यटकांना अगदी साधेपणाने सरत्या वर्षाला निरोप द्यावा लागला, मात्र 2022चे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून …

Read More »

पनवेल परिसरात ट्रॅक्टरची स्वस्तात विक्री

खरेदीसाठी लहानांसह मोठेही होतायेत आकर्षित पनवेल : प्रतिनिधी पंजाबमधील शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे पंजाबचे ट्रॅक्टर  स्वस्त झाले असून पनवेल-वडखळ महामार्गावर शेकडो ट्रॅक्टर विक्रीला असल्याचे दिसून येत आहे. रायगडमधील छोट्या शेतकर्‍यांची 250 रुपयात मिळणार्‍या ट्रॅक्टर खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. लवकरच उडणारी छोटी विमाने ही येथे विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई-गोवा …

Read More »

नववर्षानिमित्त आधारगृहात खाऊवाटप

ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळ संचालित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नवीन पनवेलच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून तालुक्यातील नेरे येथील स्नेहकुंज आधारगृहातील ज्येष्ठ नागरिक व अनाथ व्यक्तींना खाऊ वाटप कार्यक्रम शनिवारी (दि. 1) आयोजित करण्यात आला होता. या वेळेस संत …

Read More »