उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे येथील भाजपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोमवारी (दि. 3) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपर्क कार्यालय येथे झाले. जासई विभागाचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश बामा पाटील यांच्या संकल्पनेतून हे कॅलेंडर बनवण्यात आले आहे. या वेळी आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, युवा मोर्चा …
Read More »विरार अलिबाग कॉरिडॉरसंदर्भात बैठक
उपाययोजना स्पष्ट केल्याशिवाय जमिनी देणार नाही; शेतकर्यांची भूमिका उरण : प्रतिनिधी जोपर्यंत शेतकर्यांना विरार अलिबाग बहुउद्देशिय प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि जागेचा योग्य मोबदला मिळण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला जमीन न देण्याची भूमिका उरणच्या शेतकर्यांनी घेतली आहे. या संदर्भात शेतकर्यांशी चर्चा करण्यासाठी पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या …
Read More »वर्षारंभीही चिंता कायम
जुने वर्ष सरून नवे वर्ष सुरू झाले आहे. यंदा नववर्षाच्या स्वागताचा तितकासा उत्साह दिसून आला नाही. याचे कारण दुसरे तिसरे काहीही नसून कोरोना हेच आहे. गेली दोन वर्षे या वैश्विक महामारीने जगभर वाताहत केली असून हे संकट थांबायचे नाव घेत नाहीए. उलट नवनवी रूपे घेऊन कोरोना डोके वर काढत आहे. …
Read More »नववर्ष, वीकेण्डला पालीत पर्यटकांचाही ओघ वाढला
रोजगाराला मिळाली चालना पाली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली शहरात नववर्षाच्या पहिल्या व दुसर्या दिवशी शनिवारी व रविवारी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. तसेच सुधागड तालुक्यातील पर्यटनस्थळे, लेण्या, स्तूप व अन्य पर्यटनस्थळी गर्दी झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. …
Read More »रायगडातील पहिले स्किल हब नेरळमध्ये
कर्जत : बातमीदार देशभरात 5000 स्किल हबच्या माध्यमातून आठ लाख युवकांना मिळणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून स्किल हब उभारले आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिले स्किल हब नेरळ येथे उभारण्यात येत असून त्याची सुरुवात रायगड जेएसएमने पुढाकार घेऊन केली आहे. कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यत …
Read More »महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा
महाड : प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचाच्या वतीने महाडमध्ये महिलांच्या आंडरआर्म स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पंचायत समिती महिला संघ विजेता झाला. महिलांना विविध व्यासपीठ मिळवून देणारे डॉ. दिगंबर गिते यांच्या वेदा जनजागृती या सामाजिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 2) महाड येथील भिलारे मैदानावर महिलांच्या आंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »‘रोटरी’तर्फे स्वच्छता मोहिमेतून नववर्षाचे स्वागत
अलिबाग : प्रतिनिधी रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहिम राबवित केली. या वेळी त्यांनी अलिबाग समुद्रकिनारी क्रीडाभुवन येथे कचरा गोळा करुन नगरपालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला अलिबाग शहरातील रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून शनिवारी नवीन वर्षाची सुरवात स्वच्छता मोहिमेतून करायचा निर्धार डॉ. …
Read More »महड ‘गुरचरण’ला अतिक्रमणाचा विळखा
प्रशासनाचे दुर्लक्ष; तक्रारी करूनही कारवाई नाही, स्थानिकांना आरोप खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र महड हद्दीतील गुरचरण जागेत झालेले अतिक्रमण त्यामुळे भविष्यात महडच्या विकासाला बाधा येणार आहे. अनेकदा तक्रारी उपोषण करूनसुद्धा ठोस कारवाई झालेली नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड गावातील गुरचरण जागेची …
Read More »कर्जतमध्ये मशाल मिरवणूक; हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त कर्जतमध्ये हुतात्मा स्मृती समितीच्या वतीने मशाल मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील माजी सैनिकांनी आपले अनुभव सांगून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. कर्जतच्या टिळक चौकात हुतात्मा बलिदान दिनाचे …
Read More »बँक सुरक्षा कर्मचारी अशोक सालकर सेवानिवृत्त
खोपोली : प्रतिनिधी डोंबिवली सहकारी बँकेच्या खोपोली शाखेतील सुरक्षा कर्मचारी अशोक सालकर हे 30 वर्षांच्या सेवेनंतर शुक्रवारी (दि. 31) निवृत्त झाले. त्यांना खोपोली शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक प्रकाश खाडिलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. या वेळी त्यांच्या पत्नी प्रमिला सालकर व कन्या पायल सालकर उपस्थित होत्या. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper