ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला दाद देण्यासाठी बहुतेक सर्वच प्रसिद्धीमाध्यमे पुढे सरसावली. सोशल मीडियावर लोकांनी भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव केला. अजुनही तो सिलसिला चालूच आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये हे यश मिळवले आहे हे विसरता कामा नये. कोरोनाच्या महासाथीमध्ये सरावासाठी वेळ देणे मुश्किल झाले होते. संसाधनांची कमतरता …
Read More »पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर
पनवेल : वार्ताहर भारताची सर्वांत मोठी फर्टिलिटी ट्रीटमेण्ट्स साखळी असलेल्या इंदिरा आयव्हीएफने पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर उपलब्ध करून दिले आहे. पनवेलमधील के मॉलजवळ व रेल्वे स्थानकालगत हे सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. इंदिरा आयव्हीएफने मागील दशकामध्ये 85 हजारहून अधिक जोडप्यांना गर्भधारणेमध्ये मदत केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रख्यात आणि वैद्यकीय तज्ञ …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या प्रायव्हेट सेक्टरची बैठक
उरण : वार्ताहर भारतीय मजदूर संघाची (बीएमएस) प्रायव्हेट सेक्टरची राष्ट्रीय बैठक नुकतीच भोपाळ येथे झाली. या बैठकीस देशातील सर्व उद्योग क्षेत्रातचे प्रतिनिधी व अन्य प्रायव्हेट सेक्टरच्या उद्योगांचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्ष अखिल भारतीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष के. पी. सिंग, बीएमएसचे …
Read More »नवी मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी, कधी जास्त होत असल्याने तो पूर्ण जाईल की नाही, कधी जाईल? या बाबत निश्चित असे कोणालाही माहित नाही. फक्त कोरोनाला रोखण्यासाठी अथवा नियंत्रणात आणणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आरोग्याची जास्तीत जास्त काळजी …
Read More »माथेरानमध्ये मद्यधुंद तरुणाचे आत्महत्येचे नाटक
कर्जत : बातमीदार माथेरानला आलेले पर्यटक इको पॉईंटवर हमखास जातात. दिवा (जि. ठाणे) येथे राहणारा एक युवक मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचा बनाव करत येथील दरीच्या टोकावर जाऊन बसला होता. त्याला रेस्क्यू टीमच्या सहकार्याने पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले व घरी पाठविले. माथेरानच्या इको आणि किंग एडवर्ड या दोन्ही पॉईंटच्या मधोमध असलेल्या 1500 …
Read More »नेरळ व्यापारी फेडरेशनने जपली सामाजिक बांधिलकी
कर्जत : बातमीदार नेरळमधील काही भागात महापुराचे पाणी घुसले होते. या पाण्यात विद्यार्थ्यांची पुस्तके भिजली. नेरळ व्यापारी फेडरेशनने सामाजिक बांधिलकी दाखवत त्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मुसळधार पावसामुळे 21 जुलैच्या मध्यरात्री नेरळ गावातील सखल भागात पुराचे पाणी शिरले होते. सर्व लोक झोपेत असताना पाणी शिरल्याने घरातील वस्तू अन्यत्र …
Read More »युवा भारत सामाजिक संघटनेेमार्फत पूरग्रस्तांना मदत
माणगाव : प्रतिनिधी ठाणे येथील युवा भारत सामाजिक संघटनेमार्फत महाड परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना गुरुवारी (दि. 5) जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. संघटनेचे युवा सदस्य सागर पाटील, सुरेश मोरे, किशोर गुंडवार व त्यांच्या सहकार्यांनी महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जाऊन तेथील ग्रामस्थांना किराणा सामान, गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, …
Read More »नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने केली पूरग्रस्तांना मदत
कर्जत : बातमीदार नेरळमधील राजेंद्रगुरूनगर आणि राही हॉटेल परिसरात राहणार्या लोकांच्या घरात 22 जुलै रोजी महापुराचे पाणी घुसले होते. तेथील पूरग्रस्तांना नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने नेरळमधील पूरग्रस्तांना एक महिना पुरेल एवढे रेशन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष …
Read More »रायगडात काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान
जुलै महिन्यात अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप या दोन काँग्रेस नेत्यांचे निधन झाले. दोन्ही नेते जनाधार असलेले होते. त्यांची स्वतःची अशी ओळख होती. या दोन नेत्यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाला आहे. जनाधार असलेला आणि संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करू शकेल असा नेताच रायगड …
Read More »खोपोलीतील पूरग्रस्तांना शासनाने मदत करावी
भाजप नगरसेविकेचे तहसीलदारांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील अनेक घरांत पूराचे पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अपर्णा मोरे यांनी गुरुवारी (दि. 5) खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper