पनवेल : प्रतिनिधी शासनाच्या निर्देशानुसार 1 मे 2021 रोजी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. या तीन केंद्रावर केवळ ऑनलाइन अपॉइंटमेंट निश्चित करणार्या व्यक्तींना लसीकरण केले जाते. या लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागातून लसीकरण सेशन प्रसिद्ध केले जातात. …
Read More »महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे
आमदार आशिष शेलारांचा आघाडी सरकारला टोला मुंबई : प्रतिनिधी लस मिळत नाही म्हणून ओरडायचे आणि दुसरीकडे आम्ही लसीकरणामध्ये नंबर एक आहोत असे आहोत हेही ओरडायचे. त्यामुळे लस नाही हे ओरडे आपले अपयश झाकण्यासाठी सुरु आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे, असा सनसनाटी टोला भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी महाविकास …
Read More »देवीचापाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील देवीचापाडा हद्दीतील नागरिकांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्माईल फाउंडेशन, सेवा सिमरन जनता सेवा जथा, कोपरखैरणे व बेलापूर गुरुद्वारा यांचे सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम देवीचापाडा, गावदेवी मंदिराच्या मोकळ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. देवीचापाडा परिसरातील गरीब, मोलमजुरी …
Read More »कळंबोलीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 2) कळंबोलीतील गणेश मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण 71 जणांनी या शिबिरात रक्तदान केले. कोविड-19च्या …
Read More »गोवठणे गावात जंतूनाशक फवारणी
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील सेव्हन स्टँडर्ड क्रेझी बडीज ग्रुप सन 1989/90 तर्फे पूर्ण गोवठणे गावात जंतूनाशक लिक्विड फवारणी शनिवारी (दि. 1) सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळचे 5 वाजेपर्यंत करण्यात आली. तरुणवर्गाने पुढाकार घेऊन सामाजिक बांधलकीच्या उद्देशाने हे कार्य केले. आमच्या ग्रुप तर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात …
Read More »उरणमध्ये 3008 रुग्ण कोरोनामुक्त
10 हजारांहून अधिक वृद्धांचे लसीकरण उरण : वार्ताहर उरण परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी, काही सामाजिक संस्था, पोलीस, प्रशासन जीवावर उदार होऊन प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांतून उरण तालुक्यातील 3008 रुग्ण आसपास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव डावलल्याने जाहीर निषेध
प्रकल्पग्रस्त संघटनांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन उलवे नोड : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मंजूर केला गेला असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात स्थानिक …
Read More »कार अपघातात तरुणाचा मृत्यू
महाड ः प्रतिनिधी महाड-रायगड महामार्गावर रविवारी (दि. 2) तेटघर गावच्या हद्दीत भरधाव वेगाने कार चालवत असताना ती पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज राजेंद्र शिंदे (30, रा. कांबळे तर्फे बिरवाडी) हा तरुण त्याच्या ताब्यातील कारने (एमएच 06 बीयू 6048) नातेगावाहून महाडच्या दिशेने …
Read More »लॉकडाऊन काळात खवय्यांची सुक्या मासळीला पसंती
पाली ः प्रतिनिधी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे मासळीची कमी आवक, मासळीचा दुष्काळ त्याबरोबरच भाववाढीमुळे मासळी खवय्यांचा हिरमोड झाला आहे. परिणामी खवय्ये सुक्या मासळीला पसंती देताना दिसत आहेत. सुक्या मासळीचे भावदेखील स्थिर असल्याने खवय्ये आनंदात आहेत. ओली मासळी तुलनेने प्रचंड महाग झाल्याने खवय्यांना सुक्या मासळीवरच समाधान मानावे लागत …
Read More »माथेरानमध्ये माल वाहतुकीसाठी जखमी घोड्यांचा वापर; संबंधितांविरोधात कारवाईची मागणी
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संकटकाळात अनेक ठिकाणी माणुसकीची जिवंत उदाहरणे पाहायला मिळाली. मदतीसाठी अनेक हात सरसावताना दिसले, मात्र माथेरानमध्ये जखमी व आजारी घोड्यांनादेखील माल वाहतूक करण्यासाठी जुंपले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे माणुसकीदेखील ओशाळली आहे. दरम्यान, प्रशासनाने मुक्या प्राण्यांवर असे अमानुष अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper