Breaking News

Ramprahar Team

होत्याचे नव्हते झाले…

मराठा आरक्षणाबाबत राजकारण करायचे नाही असे भाजपने ठरवले होते, परंतु महाविकास आघाडीचे नेते मात्र राजकारणाशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या लढाईत फडणवीस यांची मदत घेतली असती तर आज चित्र कदाचित वेगळे दिसले असते, परंतु विरोधीपक्षाचे साह्य घेण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला कमीपणा वाटतो हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. …

Read More »

‘रेमडेसिवीर’च्या उत्पादनाला वेग

केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा तसेच औषधांची कमतरता भासू लागली आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर या कोरोनाच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या औषधाचा तुटवडाही भासू लागला आहे. अशातच आता भारतातील रेमडेसिवीरचे उत्पादन वेगाने वाढवले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री …

Read More »

रानसई धरण आटले; 20 दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील एमआयडीसीच्या रानसई धरणाची पातळी अतिशय खालावली असून फक्त 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाण्याची पातळी एक मीटरने खालावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 दिवसांचा पाणीसाठा कमी आहे. परिणामी एमआयडीसीने आता रोज 6 एमएलडी पाणी सिडकोकडून …

Read More »

आरोग्य केंद्रांच्या परिसरात सॅनिटायझेशन करा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांच्या आजूबाजूच्या परिसरात सॅनिटायझेशन करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.         नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण सेंटरच्या आजूबाजूच्या परिसराचे सॅनिटायझेशन करण्याची मागणी प्रभाग समिती …

Read More »

ममतांना निवडणूक आयोगाचा झटका

पुन्हा मतमोजणीची मागणी फेटाळली नंदीग्राम ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आपले पूर्वीचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीतील पराभवानंतर पुन्हा मतमोजणी करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, रिटर्निंग ऑफिसरचा …

Read More »

क्रिकेटप्रेमींचा हिरमोड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचे आता कुठे सुचले यावर टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. वास्तविक यात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. हा एक व्यावहारिक निर्णय आहे. क्रिकेटपटूंची सुरक्षितता आणि आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आयपीएल स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयपीएल नियोजन समितीच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. …

Read More »

विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात मनपाकडून कळंबोलीतील शानभूमीची पाहणी

नगरसेविका चारुशीला घरत यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधी भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी नुकतेच पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना कळंबोली येथे विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी दखल घेत लगेचच आरोग्य निरीक्षक जितेंद्र मडवी, अभियंता चिन्मय सापणे व पर्यवेक्षक हरीश कांबळे यांना …

Read More »

यंदा रानमेवा झाला गायब

लॉकडाऊनमुळे विक्रीसाठी अडचणी नवी मुंबई ः प्रतिनिधी सध्या कोणतेही फळ वर्षभर कधीही अगदी सहज मिळते. त्यामुळे त्या त्या हंगामात फळे खाण्याची रंगत आता कमी होत चालली आहे, मात्र असे असले तरी ताडगोळे, करवंदे, जांभूळ, पिवळा रानमेवा उन्हाळ्यातच मिळतो. त्यामुळे या फळांना या हंगामात चांगली मागणी असते, मात्र लॉकडाऊनमुळे हा रानमेवा …

Read More »

उरण नगर परिषदेतील कामगारांचा सन्मान

उरण ः वार्ताहर कोरोनाच्या संकटकाळात उरण नगर परिषदेमधील कामगार-कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता साफसफाईचे महत्त्वपूर्ण काम केले. या सेवेबद्दल कामगार-कर्मचार्‍यांचे सोमवारी (दि. 3) उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते औक्षण करून त्यांना कोरोना योद्धे प्रमाणपत्र तसेच त्यांच्या सेवेप्रति आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …

Read More »

‘परमशांतीधाम’मधील रुग्ण झाले कोरोनामुक्त

पनवेल : प्रतिनिधी तळोजा येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील कोरोनाबाधित पनवेल महानगरपालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांनी कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल महापालिका गेले 14 दिवस बाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा देत होती. अखेर येथील बाधित रुग्ण पूर्णतः बरे झाले असून येथील स्वामीजींनी महापालिकेचे आभार मानले आहेत. तळोजा एमआयडीसीमधील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील वृद्ध 17 एप्रिल रोजी बाधित …

Read More »