Breaking News

Ramprahar Team

बुडबुड्यांचा अर्थसंकल्प

समाजातील सर्व घटकांस न्याय देणारा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली, तेव्हा सर्वसामान्य लोक बुचकळ्यात पडले असतील. कारण महाविकास आघाडीच्या या दुसर्‍या अर्थसंकल्पातूनही सामान्य मराठी माणसास काहीही हाती लागलेले नाही. आणि या वस्तुस्थितीला सामान्य माणसांना …

Read More »

कर्जत मालेगाव येथे दिवसाढवळ्या चोरी

साडे तीन लाखांचे सोने लंपास कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्गावरील मालेगाव या गावाचे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या बंगल्यात घुसून रविवारी (दि. 7) दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. त्यात तब्बल साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. मालेगाव (ता. कर्जत) चे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या मुलाचे …

Read More »

बोरघाटात खाजगी बसला अपघात

चालकाच्या प्रसंगावधानामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले खालापूर, खोपोली : प्रतिनिधी  मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे जाणार्‍या एम ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसचे (एमएच-03,सीव्ही-3778) सोमवारी (दि. 8)  सकाळी बोरघाटातील ढेकू गावाजवळ ब्रेक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवून महामार्गालगत असलेल्या झाडाच्या आधारावर ही बस थांबवली. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. …

Read More »

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात

कर्जत ़: बातमीदार कोरोना पार्श्वभूमीवर आघाडीवर राहून काम करणारे वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना कोविशिल्ड लस देण्यास नेरळमध्ये सोमवार (दि. 8)पासून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांना पहिली कोविशिल्ड लस देण्यात आली. पहिल्या दिवशी 23जणांना लस …

Read More »

कडाव-माणकिवली रस्त्यावरील मोरी धोकादायक; अपघाताची शक्यता

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली हेजवळपास तीनशे लोकवस्तीचे गाव असून ते विकासापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे. गावात ये – जा करण्यासाठी कडाव – माणकिवली हा एकमेव रस्ता असून, त्यावरून जाताना पादचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते तर दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांतून प्रवास करणार्‍यांना उंटावरून प्रवास करत …

Read More »

महिला दिनीच पीडित महिला न्यायापासून वंचीत

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील साकडी येथील एका तरुणीला काही तरुणांनी घरात घुसून मारहाण आणि तिचा विनभंग केला होता. या प्रकरणातील आरोपींची जागतिक महिला दिनी सोमवारी (दि. 9) जामिनावर सुटका झाली.  या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून, पीडित महिलेला न्याय्य मिळवून देण्यासाठी पुढे आली आहे. महाड तालुक्यातील साकडी येथील निहा परवेज …

Read More »

रायगडात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -अश्विनी पाटील खोपोलीत खरेदीसाठी आलेल्या महिलांचे भाजपतर्फे स्वागत खोपोली : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून  खोपोलीतील दीपक चौकात सोमवारी खरेदीला आलेल्या महिलांचे भाजप महिला मोर्चातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे खरेदीला आलेल्या महिलांनाही आश्चर्याचा धक्का बसला व त्यांनी भाजप महिला मोर्चाचे आभार मानले. …

Read More »

रोहा येथे विविध सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरंपच नितीन वारांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रोठ बुद्रुक गावामध्ये वृक्षारोपण व मास्कवाटप करण्यात आले. तसेच तळाघर हायस्कूल येथील गरीब व गरजुंना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमास सरंपच नितीन वारांगे, दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा …

Read More »

कोकणातील नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला,  अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज यांनी नाणार रिफायनरीबाबत …

Read More »

चार हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम

खोपोली : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या टाटा स्टील बीएसएल प्लांटने टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या 182 व्या जयंती वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतात उद्योजकतेचा पाया ज्यांनी रचला असे महान, द्रष्टे उद्योगपती जमशेदजी नसरवानजी टाटा यांना खोपोलीच्या टाटा स्टील बीएसएलचे एक्झिक्युटिव्ह …

Read More »