उरण ः वार्ताहर येथील उरण मेडिकल वेल्फेअर असोशिएशनच्या सर्व डॉक्टरांना सोमवारी (दि. 1) फेब्रुवारी रोजी कोविड लस देण्यात आली. या सरकारच्या उपक्रमांत 80 डॉक्टरांना हि लस देण्यात आली. या वेळी डॉक्टरांनी नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले. जनसामान्यांच्या मनात सध्या कोविड लसीकरणाबाबत खूप संभ्रम आहे. त्यासाठी उरणच्या डॉक्टरांनी आवाहन केले …
Read More »चिरनेरच्या वनसंपदेची वणव्यांत होरपळ
परिसरात आगी लावण्याचे सत्र सुरू वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरांना वणवे लावण्याचे धाडसत्र समाज कंटकांकडून सालाबादप्रमाणे सुरूच आहे. असाच वणवा सोमवारी दुपारच्या सुमारास चिरनेर परिसरातील टाकीगाव बस थांब्या जवळील निरुपणकार स्वर्गीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन करण्यात आलेल्या टेकडीला …
Read More »विस्तवाशी खेळ
वास्तविक शेतकर्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्या आंदोलनापासून दोन हात दूरच ठेवले आहे. तरी देखील काँग्रेस, आम आदमी पक्ष यांसारखे राजकीय पक्ष वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याच्या इराद्याने शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये लुडबुड करताना दिसतात. मंगळवारी त्यामध्ये शिवसेनेची भर पडली. आता शिवसेनेचा शेतकर्यांबद्दल असलेला कळवळा किती दांभिक आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतो. राजधानी …
Read More »विषाची पेरणी
कोण कोठला शरजील उस्मानी नावाचा एक फाटका तरुण पुण्यात येतो आणि समस्त हिंदू समाजाबद्दल विषारी गरळ ओकून जातो. तरीही सरकार मुर्दाडासारखे गप्प बसून राहते. हा सारा प्रकार आहे तरी काय? शरजील उस्मानी याची हिंदूविरोधी गरळ जितकी राजकीय आहे, तितकेच महाराष्ट्राच्या सरकारचे गप्प बसणे देखील राजकीय आहे. बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वीण …
Read More »‘सेव युथ, सेव नेशन’साठी ‘रोटरी’ची सायकल रॅली
पनवेल ः प्रतिनिधी आज तरुण पिढी व्यसनाधिन झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे असल्याने रविवारी (दि. 31) सकाळी रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि रनथॉन सायकलिंग ग्रुप न्यू पनवेल यांनी ’सेव युथ, सेव नेशन’साठी एकत्रित येऊन नागरिकांना धूम्रपानाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी सायकल रॅली काढून जागरूकता निर्माण …
Read More »लॅपटॉप, मोबाइल चोरणार्या दोघांना अटक
पनवेल ः वार्ताहर लॅपटॉपसह मोबाइल चोरी करणार्या दोन जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने गजाआड केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे तळोजा पोलीस ठाणे व नेरूळ पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अभिषेककुमार सिंग यांच्या चौथ्या माळ्यावरील राहत्या घराच्या टॉयलेट पाइपद्वारे खिडकीच्या स्लायडिंग …
Read More »लोखंडी चॅनेल चोरणारे गजाआड
पनवेल ः वार्ताहर शहरातील लेबर कॅम्प विरुपाक्ष हॉलच्या बाजूला पनवेल येथे सुरू असलेल्या काँक्रीट रोडच्या कामाच्या ठिकाणावरून दोन लाख 90 हजार रुपयांचे 14 लोखंडी चॅनेल चोरल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व …
Read More »खालापुरातील उंबरखिंडीत विजय दिन साजरा
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व सरदार रायबाधन यांच्या 30 हजार फौजेवर समरभूमी उंबरखिंड (ता. खालापूर) येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी ज्या 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता, त्यापैकी ही एक लढाई आहे. या विजयी दिवशी छावणी येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, …
Read More »दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी विश्वासार्हता गमावली : गडकरी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. या आंदोलकांनी आपली विश्वासार्हता गमावल्याचे गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. या वेळी गडकरींनी अर्थसंकल्पाविषयीही आपले मत मांडले. अर्थसंकल्पाचे आणि विशेषत: स्क्रॅप पॉलिसीचे त्यांनी कौतुक केले आहे. शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार …
Read More »रसायनीतील शिवस्मारकांचे सुशोभीकरण
मोहोपाडा : प्रतिनिधी चौक बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पुतळ्यामागील कमान याची झालेली दुरवस्था बघून रसायनी विभाग संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी या शिवस्मारकाचे सुशोभीकरण केले. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून रंगरंगोटी केली. एक हात समाजसेवेसाठी या वाक्याचा अभिमान बाळगत रसायनी विभाग संभाजी ब्रिगेड अध्यक्ष केदार शिंदे, अजित पाटील या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper