Breaking News

Ramprahar Team

द्रोणागिरी पोलीस ठाण्याची दुर्दशा

सिडको व राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल रोडवरील फुंडे कॉलेज समोरील द्रोणागिरी नोडच्या सुरक्षेसाठी सुमारे 24 वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या पोलीस ठाण्याची इमारत पूर्णतः खंडर झाली आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यास सज्ज होण्याआधीच या पोलीस ठाण्याला भूतबंगल्याची अवकळा आल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. सिडको व राज्य शासनाने …

Read More »

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात मॉक ड्रील

नागोठणे : प्रतिनिधी भंडारा येथे नुकतीच घडलेली भयावह दुर्घटना येथे पुन्हा घडू नये, या भावनेतून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी येथील आरोग्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिलचे आयोजन केले होते.  डॉ. म्हात्रे यांनी या वेळी केंद्रातील कर्मचार्‍यांच्या सहभागातून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक सादर केली. केंद्रात आपत्ती …

Read More »

मुरुडमध्ये डायलिसिस रुग्णांकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू

मुरुड : प्रतिनिधी संजीवनी आरोग्य सेवा संस्थेच्या येथील डायलिसिस सेंटरमध्ये येणार्‍या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा शुभारंभ नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा  लागू झाल्याने आता संस्थेच्या  सेंटरमध्ये डायलिसिससाठी माफक खर्च येणार …

Read More »

पेण नगरपालिकेकडून शहरात धूर फवारणी

पेण : प्रतिनिधी डास निर्मूलनासाठी पेण शहरात नगरपालिकेच्या वतीने धूरफवारणी आणि गटारात ऑईल टाकण्यास सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण 10 कर्मचार्‍यांच्या सहाय्याने डास निर्मूलन मोहीम राबवित आहेत. पेण शहरातील ओला …

Read More »

पेण पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अजय क्षीरसागर

पेण : प्रतिनिधी माजीमंत्री तथा आमदार रविशेठ पाटील यांचे निष्ठावंत समर्थक अजय क्षिरसागर यांची पेण नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे. पक्षांतर्गत समझोत्यानुसार प्रशांत ओक यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजय सुरेश क्षिरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी (दि. 13) …

Read More »

‘गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार’

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील वाशी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन कल्याणचे माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रभारी निवृत्ती पवार यांनी येथे दिले. वाशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गावविकास आघाडी केली आहे. या आघाडीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवारांच्या प्रचाराची आढावा बैठक …

Read More »

रायगडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नऊ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 15 पैकी नऊ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकच रुग्ण आढळला. रायगड जिल्ह्यात 8 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर सण, उत्सव व समारं भाच्या निमित्ताने …

Read More »

पनवेलमध्ये श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी

शनि मंदिरात समाजबांधवांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त संत तुकारामांचे लेखनिक आणि शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी पनवेल मधील टपालनाका येथील शनिमंदिरात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी …

Read More »

जुई गावात ‘दिबां’ची जयंती

पनवेल : रामप्रहर वृत्त जुई (कामोठे) गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि एकता ग्रुप मित्र मंडळ यांच्या वतीने परिराणी कार वॉशिंग सेंटर जुई येथे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आले …

Read More »

पटवर्धन रुग्णालयाच्या अद्ययावत ऑपरेशन थिएटरची पाहणी

बाळासाहेब पाटील, विक्रांत पाटील यांची सदिच्छा भेट पनवेल : वार्ताहर पनवेल येथील डॉ. पटवर्धन रुग्णालयाच्या माध्यमातून नवीन अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या वेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील …

Read More »