Breaking News

Ramprahar Team

उरण भारतीय जनता पक्षातर्फे सावरखार येथे कापडी पिशव्यांचे वाटप

उरण : वार्ताहर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरण यांच्या वतीने सेवा सप्ताहाचे औचित्य साधून रविवारी (दि. 20)  आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उरण तालुका उपाध्यक्षा निर्मला प्रभाकर घरत यांच्या हस्ते उरण तालुक्यातील सावरखार येथील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ज्या महिलांना …

Read More »

सेवा सप्ताहानिमित्त प्रमाणपत्र वाटप

ठाणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे साहेबांच्या प्रयत्नाने शुक्रवारी (दि. 18) कळवा मंडळातर्फे कळव्यातील जनसंपर्क कार्यालय, येथे आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना तसेच प्रमाणपत्र निरंजन डावखरे व महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

आयपीएलचे नवे पर्व

इंंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या पर्वाला शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सलामीच्या लढतीने प्रारंभ झाला. अपेक्षेप्रमाणे हा सामना रंगला आणि यात चेन्नईने मुंबईवर मात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ते स्वीकारून खेळाडूंसह प्रेक्षक क्रिकेटचे नवे स्वरूप अनुभवत आहेत. जागतिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलची …

Read More »

पेण भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर

पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसनिमित्त भाजपच्या वतीने सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने पेण मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 20) पेण शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. कोरोना या महाभयंकर रोगामुळे देशातील जनतेला रक्ताची गरज भासत आहे. सध्या रक्तदान करण्याचे प्रमाण कमी …

Read More »

पनवेलमध्ये 258 नवे कोरोनाबाधित

एका रुग्णाचा मृत्यू    252 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी  (दि.20) कोरोनाचे 258  नवीन रुग्ण आढळले असून एकाचा  मृत्यू  झाला आहे, तर 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 212 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 192 रुग्ण बरे झाले आहे. …

Read More »

जेएनपीटीत हिंदी पंधरवडा उत्साहात साजरा

उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. कोविड 19 महामारीच्या अनुषंगाने भारत सरकारच्या राजभाषा विभाग, गृह मंत्रालयाच्या वतीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत जेएनपीटीमध्ये हिंदी पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 14 सप्टेंबरला हिंदी पंधरवडा समापन समारंभ झाला. आपल्या रोजच्या कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदीचा …

Read More »

स्टेट बँकेकडून रसायनीत रोपांची लागवड

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी येथील स्टेट बँकेच्या वतीने झाडे लावा पर्यावरण वाचवाचा संदेश देत परीसरात वृक्षलागवड करण्यात आली. या वेळी मोहोपाडा रसायनी येथील स्टेट बँके शाखेच्या आवारात तसेच इतर परीसरात विविध जातींच्या शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. ही वृक्षलागवड सिएसआर एक्झिक्युटिव्ह फंडातून होत असल्याचे स्टेट बँकेच्या रसायनी शाखेच्या मॅनेजर संगीता …

Read More »

कळंबोली येथील गुरुद्वाराला आर्थिक मदत

अमर ठाकूर यांच्या जन्मदिनाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांचा वाढदिवस रविवारी (दि. 20) सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कळंबोली येथील गुरुद्वारामध्ये 21 हजार रुपयांचा धनादेश अमर ठाकूर यांनी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला. कळंबोळी …

Read More »

सेवा सप्ताहानिमित्त ठिकठिकाणी उपक्रम

भाजपकडून महिलांना कंदील बनवण्याचे प्रशिक्षण पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आत्मनिर्भर भारत संकल्प मोहीम प्रमुख तथा भाजप खारघर तळोजा महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील आणि सहप्रमुख तथा खारघर तळोजा महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार यांच्या सहकार्याने राबविण्यात आली. या वेळी …

Read More »

नेरळचे रेल्वे फाटक दोन दिवस बंद

कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ-भिवपुरी रोड रेल्वेस्टेशनदरम्यान असलेले फाटक 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या ठिकाणी असलेल्या रुळाखाली खडी टाकण्याचे काम करण्यासाठी हे फाटक बंद ठेवले जाणार असून यापूर्वी याच महिन्यात तीन दिवस फाटक बंद ठेवण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर …

Read More »