Breaking News

Ramprahar Team

खारघरमधील सोसायट्यांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा सिडको यांच्याकडे प्रभागातील अपुर्‍या प्रमाणात होणार्‍या पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील प्रभाग क्र. 4 मधील से 19,20,21 व 11,13 येथील बहुतांश सोसायटीमध्ये मागील एक महिन्यापासून पाणी …

Read More »

राज्य सरकारविरोधात मराठा समाजाकडून घोषणाबाजी

नवी मुंबई : बातमीदार राज्यामध्ये मराठा समाजासाठी लागू असलेल्या आरक्षणाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरलेली असून नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, माजी …

Read More »

राज्य सरकारचा पिंडदान करून केला निषेध

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यास पुरते अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पिंडदान करत मनसे नवी मुंबईने अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. कोरोनाजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरलेले आहे. वेळेवर आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना मृत्यूस सामोर जावे लागत आहे. रॅमिडिसिव्हर व टोसिलिजम एब …

Read More »

थर्मल गन, ऑक्सिमीटरचा काळाबाजार

पनवेल : बातमीदार कोरोनाकाळात मुखपट्टी, जंतुनाशके, रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधे, ऑक्सिमीटर, थर्मल गन, आणि इतर औषधांचा काही औषध दुकानांकडून काळा बाजार करीत एमआरपीच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जात आहे. पाच हजारांपर्यंत असलेल्या थर्मल गनची खुल्या बाजारात आठ हजार रुपये लावण्यात आले आहेत, तर ऑक्सिमीटरची किंमत देखील दुप्पट आहे. औषध …

Read More »

सेवा सप्ताहानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीतील प्रभाग 17, 19 आणि 20मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम सेवा सप्ताह अंतर्गत राबविण्यात आले.

Read More »

टाचदुखीपासून मिळवा मुक्ती

आरोग्य प्रहर आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सूज येणे अशा अनेक समस्या उद्भवतात, तर कधी खूप वेळ उभे राहिल्याने, अधिक वजन असल्यास किंवा आपण जर चुकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखू लागतात, मात्र …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

माणगाव ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत माणगावात बुधवारी (दि. 16) उपजिल्हा रुग्णालय व क्रिटीकेअर हॉस्पिटल येथील रुग्णांना भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे व महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांच्या हस्ते व सहकारी …

Read More »

शेकडो शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान; जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव रोहे ः प्रतिनिधी कोकणातील रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले होते. वादळात अनेक घरांवरील छपरे उडून महाकाय झाडे पडली. त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतीचीही हानी झाली होती. याबरोबरच सरकारी इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान जिल्हा परिषदेच्या शाळांचे झाले …

Read More »

सरकारच्या जबाबदारीचे काय?

गेला पाच महिन्यांहून अधिकचा काळ महाराष्ट्र कोरोनाविरोधी लढाईत सपाटून मार खात असताना जनतेमध्ये किमान मास्क वापरण्यासंदर्भातील जागृती हे सरकार का निर्माण करू शकलेले नाही. आता काय, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी मोहीम राबविली जाणार आहे. मग इतके दिवस प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी कुणाकडे होती? सरकारवर भिस्त ठेवून कुणीच वागत नव्हते आणि …

Read More »

बँक ऑफ इंडियाकडून हिंदी महिना साजरा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विभागीय प्रमुख एम. अन्बुकमणि व समस्तल कर्मचार्‍यांच्या …

Read More »