पनवेल : रामप्रहर वृत्त साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था, खोपोली मठाधिपती योगी भाईनाथ महाराज यांच्या वतीने शिरवली ग्रामपंचायत अंतर्गत भल्ल्याची वाडी येथील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे आदिवासींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पत्रकार मयूर तांबडे यांनी या परिस्थितीची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले. …
Read More »गोकुळाष्टमीनिमित्त नवचंडी होम पूजा
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमीनिमित्त किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या 13व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गोवर्धनी मातेची आराधना तसेच नवचंडी होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते. या होमहवन व पूजा बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडली. कोरोनासारखा महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, …
Read More »एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारण्याची मागणी
खारघर : प्रतिनिधी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारावी तरच नवे उद्योजक घडतील, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. महाराष्ट्रात छोटे मोठ्या अंदाजे 295 एमआडीसी कार्यक्षेत्र आहेत. या भागातील उद्योजकांना जागे संदर्भात शासकीय योजना विजे संदर्भात आणि शासकीय परवानग्याची या …
Read More »बेड्ससाठी नवी मुंबई मनपाचा खासगी रुग्णालयांशी करार
पनवेल : बातमीदार पालिकेच्या पातळीवर बेड्स आणि मनुष्यबळ यातील ताळमेळ आणि रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई आणि पनवेल महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. यात नवी मुंबई पालिकेने अतिदक्षता, प्राणवायू पुरविणारी यंत्रणा असलेल्या खाटा आणि कृत्रिम श्वसनयंत्रणा पुरविण्यासाठी खासगी रुग्णालयांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पनवेल पालिका प्रशासनाने …
Read More »वृक्षछाटणीची जबाबदारी सिडकोने घेतली पाहिजे
भाजप नेते संदीप पाटील यांची भूमिका पनवेल : वार्ताहर निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ आलेल्या वादळी वार्यांनी पनवेल परिसरामध्ये वाताहत केली आहे. या दोन वादळांचा तडाखा सहन केल्यानंतर शेकडो बहुवार्षिक वृक्ष उन्मळून पडले. वृक्ष पडझडमध्ये नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीसुद्धा उन्मळून पडलेल्या वृक्षांबाबत यंत्रणेचे बोटचेपीचे धोरण राहिले आहे. पर्जन्यमान …
Read More »मोदी विश्वनायकच!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही हे भारतीयांना एव्हाना पूर्णपणे पटलेले आहे. कारण गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी तडफेने घेतलेले निर्णय जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि अनुभवले देखील आहेत. सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास साधावयाचा असेल तर मोदींना पर्याय नाही हे सत्य आहे. विरोधी पक्षांनी ते आता …
Read More »भाजप उरण महिला मोर्चाने जोपासला रक्षाबंधनातून स्नेहबंध
उरण : वार्ताहर भारतीय जनता पार्टी उरण महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 8) कोविड योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी जे लढत आहेत, त्या योद्ध्यांच्या हाताला आणखी बळ याव या उद्देशाने राखी बांधून व कोविड योद्धा प्रमाणपत्र उरण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.त्याच प्रमाणे उरण …
Read More »पारसिक हिलवर उन्मळलेल्या झाडांना जीवदान
नवी मुंबई : बातमीदार रेसिडेंट असोसिएशनकडून निसर्ग वाढवण्यासाठी धडपडणार्या या संस्थेने निसर्ग वाचवण्यासाठी पारसिक हिलवर केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत असेच म्हणावे लागेल. त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे क्रेनच्या साहाय्याने पुनररोपण करत नवी मुंबईसमोर आदर्श निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवादार पावसात नवी मुंबईतील पारसिक …
Read More »मराठा क्रांती मोर्चाची आज रोह्यात धडक
रोहा : रामप्रहर वृत्त मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आढावा बैठक शनिवारी (दि. 8) झूममार्फत ऑनलाइन पद्धतीने झाली. रोहा तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमागील राजकारण दूर होऊन, योग्य तो तपास पूर्ण करून गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात येईल. त्याचप्रमाणे पीडित बहिणीचे कुटुंब या संकटकाळात एकटे नसून संपूर्ण समाज …
Read More »विधी शाखा व भागूबाई चांगू ठाकूर महाविद्यालयातर्फे वेबिनार
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीकेसी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2020 – 21 अंतर्गत; ‘लाँ अॅाट युवर डोअर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper