Breaking News

Ramprahar Team

करंजा-रेवस तरसेवा सुरू

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश उरण : वार्ताहर करंजा ते रेवस तर (बोट) सेवा सोमवार (दि. 22) पासून सुरु झाली. उरणचे आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. तर (बोट) मध्ये 25 प्रवासी प्रवास करतील. सर्व प्रवाशांनी सामाजिक अंतर ठेऊन बोटीमध्ये प्रवेश आणि प्रवास करावा. बोट सकाळी …

Read More »

दीपक मोकल यांची नियुक्ती

रेवदंडा ः प्रतिनिधी को. ए. सो. चे माजी मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक दीपक मोकल यांची व्हॉलीबॉल असोसिएशन इंडियाच्या उपाध्यक्षपदी आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे येथील पिंपळनेरमध्ये 19 जूनला व्हॉलीबॉल असोसिएशनच्या कार्यकारी  मंडळाची सभा झाली. या सभेत आमदार मंजुळा गावित, माजी खासदार डॉ. राजेंद्र गावित,  महाराष्ट्र …

Read More »

‘रोटरी’कडून वादळग्रस्तांना मदतीचा हात

200 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या झुगरेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक रवी काजळे यांनी पुढाकार घेऊन रोटरी क्लबच्या माध्यमातून आदिवासी आणि गरजू ग्रामस्थांना महिनाभर पुरेल एवढे धान्य मदत म्हणून उपलब्ध …

Read More »

रेवसमध्ये 15 दिवस पाणीपुरवठा खंडित

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील रेवस पाणी योजनेच्या झोन क्र. 1मध्ये सुरू असलेल्या टँकरमुळे गावकर्‍यांची तहान भागत असली तरी सर्वच ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी त्यांना योजनेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गेली 12 ते 15 दिवस पाणीपुरवठा खंडित झाल्याने गावकरी हैराण झाले आहेत. रेवस पाणीपुरवठा योजनेला 30 वर्षे झाली …

Read More »

मुरूड पालिकेलाहोमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

अंजुमन महाविद्यालयाचा उपक्रम मुरूड : प्रतिनिधी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स आणि माजी नगराध्यक्ष रहीम कबले यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड नगर परिषदेतील सर्व कर्मचार्‍यांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमियोपॅथिक गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले मुरूड नगर परिषद कोरोनापासून शहरी नागरिकांचा बचाव व संरक्षण होण्यासाठी उपाययोजना करीत आहे, परंतु सफाई …

Read More »

सिलिंडर टाक्या चोरणार्या टोळीचा खालापूर पोलिसांनी लावला छडा

सात जण अटकेत खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील पौध गावाच्या हद्दीत असलेल्या कारखान्यातून सिलिंडर टाक्यांची चोरी करणार्‍या टोळीचा छडा खालापूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी महादेव वामन वाघमारे (वय 42, रा. खानाववाडी), चंद्रकांत मारुती पवार (37, वरोसेवाडी), संतोष बबन अहिरे (23), रामदास बबन अहिरे (25, दोघेही रा. लाखरन, तिवरे, …

Read More »

आला पावसाळा, तब्येत सांभाळा!

आरोग्य प्रहर दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेगवेगळे आजार मान वर काढायला सुरुवात करतात. कारण वातावरणात झालेल्या बदलांचा प्रकृतीवर परिणाम होत असतो. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशा समस्या नेहमी उद्भवतात. त्यातच या वर्षी कोरोनाची माहामारी असल्यामुळे सगळ्याच लोकांना आजारी पडण्याची जास्त भीती वाटत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या माहामारीत …

Read More »

अहो आश्चर्यम्! नेरळमध्ये रस्त्याची चोरी

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये चक्रावून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत ग्रामनिधीमधून केलेला एक रस्ताच चोरीला गेला आहे. एप्रिल 2019मध्ये नेरळ  हेटकरआळी भागात एका काँक्रीट रस्त्याचे काम करून बिल काढण्यात आले होते, मात्र आता तो रस्ताच त्या ठिकाणी नसल्याने …

Read More »

संकट सरण्याची आशा

आताच्या घडीला जगभरातच कोरोना संकट अधिक गहिरे झाल्याचे चित्र निर्विवादपणे दिसते आहे. परंतु तरीही आशेला जागा आहे असे म्हणायला हरकत नाही. परिणामकारक ठरणारी औषधे बाजारात येऊ घातली आहेत. प्रभावी लसही पाठोपाठ येईलच. तोवर मात्र आपण खबरदारी घेत राहिलेच पाहिजे. जगभरातील तमाम देशांतील जनजीवन जवळपास ठप्प करणार्‍या कोरोना संकटाचे सध्याचे चित्र …

Read More »

वाढीव वीज बिलाने नवी मुंबईकर हैराण

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत सध्या वाढीव वीज बिलाने सर्वच हैराण झाले आहेत. महावितरणने कोणतेही रिडिंग न घेता हे वीज बिल पाठवल्याने नागरिकांना हे बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊन असल्याने महावितरणकडून गेले तीन महिने मीटर रिडींग घेतले गेलेले नाही. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महावितरणला बिल पाठवता …

Read More »