Breaking News

Ramprahar Team

चिनी वस्तूंची विक्री न करण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेलसह रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीस आपल्या दुकानात ठेवू नयेत असे आवाहन केले आहे. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय मनोजसंसारे यांनी चिनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच चिनच्या मालाला बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. …

Read More »

यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच!

पनवेल : वार्ताहर गेल्या 31 वर्षांची परंपरा असलेल्या तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या पायोनियर विभागातील अभिनव युवक मित्र मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अभिनव युवक मित्र मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी झाली. या सभेत मंडळाचे अध्यक्ष रमेश चव्हाण, खजिनदार शैलेश कदम, …

Read More »

रसायनीत चार नव्या रुग्णांची भर

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीत कोरोनाचे नव्याने चार रुग्ण आढळले आहेत. रिस, भटवाडी, कांबे, रिसवाडी येथे प्रत्येकी एक असे नव्याने चार कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी दिली आहे. तर आपटा आरोग्य केंद्रहद्दीत आपटा ते दापिवली भागात सध्या कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती डॉ. प्रियंका चव्हाण यांनी बोलताना दिली. …

Read More »

वाढदिवसानिमित कोप्रोली येथे गरजूंना चादर, चटईचे वाटप

उरण : वार्ताहर भाजपचे नेते तथा जेएनपीटी कामगार नेते हेमंत भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 20) उरण तालुक्यातील कोप्रोली येथे गरीब गरजू बांधवांना चटई व चादरीचे वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, बबन पाटील, प्रदीप घरत, रवींद्र तांडेल, रमणिक म्हात्रे, शाळा कमिटी अध्यक्ष लाखन पाटील …

Read More »

वर्षा सहलीस येणार्यांवर होणार कारवाई

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या विषाणूचा फैलाव शहरी भागासह ग्रामीण भागात होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी ठिकाणावरुन वर्षासहलीस पनवेल परिसरात येणार्‍या पर्यटकांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. पावसाळ्यात धरण क्षेत्रात येणार्‍या पर्यटकांना मज्जाव घालण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले …

Read More »

पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे राहणार बंद!

पनवेल : वार्ताहर राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडलेले व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. पनवेल परिसरात दरदिवशी कोरोनाच्या रूग्णांत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल प्रशासनाने शहरातील गर्दीचे ठिकाणे बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील पर्यटनस्थळे …

Read More »

रिलायन्स टाऊनशिप परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे. परिणामी या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील बी-150मधील रूम नं. बी-149 ते बी-152 रूमपर्यंतचे क्षेत्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या …

Read More »

चिनी राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

अलिबाग ः प्रतिनिधी सीमेवरील चीनच्या कुरापतींमुळे देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. वेगवेगळ्या मार्गांनी चीनच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे. त्या अनुषंगाने अलिबागेतील चेंढरे येथे नागरिकांनी एकत्र येत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी नागरिकांच्या हातात चीनविरोधातील घोषणांचे फलक होते, तसेच भारतमाता की जय आणि चीनविरोधात …

Read More »

वादळाच्या तडाख्यातही पक्षी घरट्यातच

माणगाव ः प्रतिनिधी संकटांशी जिद्दीने सामना करण्याची पक्ष्यांची अनोखी पद्धत असून 3 जूनला रायगडात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात असेच एक निरीक्षण समोर आले आहे. हवामानाचे अचूक अंदाज सांगणारे पशुपक्षी नैसर्गिक आपत्तींना धैर्याने तोंड देत असल्याचे दिसून आले. निसर्ग चक्रीवादळाचे वारे ताशी 120 किमी वेगाने वाहत होते. या वादळात घरांचे, इमारतींचे व …

Read More »

माणगावमधील शेकडो गावे अद्यापही अंधारात

वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. माणगाव नगरपालिका हद्दीतील जवळपास 70 टक्के भागातील वीजपुरवठा सुरू झाल्याने आता हळूहळू 15 दिवसांनंतर का होईना लोकवसाहती उजळत आहेत. अजूनही 30 टक्के भागातील खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत, पण महत्त्वाचा नगरपंचायत पाणीपुरवठा विद्युत …

Read More »