Breaking News

Ramprahar Team

वाढदिवसानिमित कोप्रोली येथे गरजूंना चादर, चटईचे वाटप

उरण : वार्ताहर भाजपचे नेते तथा जेएनपीटी कामगार नेते हेमंत भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 20) उरण तालुक्यातील कोप्रोली येथे गरीब गरजू बांधवांना चटई व चादरीचे वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, बबन पाटील, प्रदीप घरत, रवींद्र तांडेल, रमणिक म्हात्रे, शाळा कमिटी अध्यक्ष लाखन पाटील …

Read More »

वर्षा सहलीस येणार्यांवर होणार कारवाई

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या विषाणूचा फैलाव शहरी भागासह ग्रामीण भागात होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी ठिकाणावरुन वर्षासहलीस पनवेल परिसरात येणार्‍या पर्यटकांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. पावसाळ्यात धरण क्षेत्रात येणार्‍या पर्यटकांना मज्जाव घालण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले …

Read More »

पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे राहणार बंद!

पनवेल : वार्ताहर राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडलेले व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. पनवेल परिसरात दरदिवशी कोरोनाच्या रूग्णांत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल प्रशासनाने शहरातील गर्दीचे ठिकाणे बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील पर्यटनस्थळे …

Read More »

रिलायन्स टाऊनशिप परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे. परिणामी या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील बी-150मधील रूम नं. बी-149 ते बी-152 रूमपर्यंतचे क्षेत्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या …

Read More »

चिनी राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

अलिबाग ः प्रतिनिधी सीमेवरील चीनच्या कुरापतींमुळे देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. वेगवेगळ्या मार्गांनी चीनच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे. त्या अनुषंगाने अलिबागेतील चेंढरे येथे नागरिकांनी एकत्र येत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी नागरिकांच्या हातात चीनविरोधातील घोषणांचे फलक होते, तसेच भारतमाता की जय आणि चीनविरोधात …

Read More »

वादळाच्या तडाख्यातही पक्षी घरट्यातच

माणगाव ः प्रतिनिधी संकटांशी जिद्दीने सामना करण्याची पक्ष्यांची अनोखी पद्धत असून 3 जूनला रायगडात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात असेच एक निरीक्षण समोर आले आहे. हवामानाचे अचूक अंदाज सांगणारे पशुपक्षी नैसर्गिक आपत्तींना धैर्याने तोंड देत असल्याचे दिसून आले. निसर्ग चक्रीवादळाचे वारे ताशी 120 किमी वेगाने वाहत होते. या वादळात घरांचे, इमारतींचे व …

Read More »

माणगावमधील शेकडो गावे अद्यापही अंधारात

वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. माणगाव नगरपालिका हद्दीतील जवळपास 70 टक्के भागातील वीजपुरवठा सुरू झाल्याने आता हळूहळू 15 दिवसांनंतर का होईना लोकवसाहती उजळत आहेत. अजूनही 30 टक्के भागातील खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत, पण महत्त्वाचा नगरपंचायत पाणीपुरवठा विद्युत …

Read More »

उत्तम आरोग्यासाठी लाल फळे

आरोग्य प्रहर निरोगी राहण्यासाठी निरोगी दिनक्रमाबरोबरच आहारामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असलेली लाल फळेसुद्धा गरजेची आहेत. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्सयुक्त असलेल्या या गोष्टी बर्‍याच आजारांपासून बचाव करतात. बीट- अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम, फायबर, फॉलेट आणि व्हिटॅमिन्सने भरपूर बीट आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीसुद्घा खूप फायदेशीर आहे. यात आढळणारी पोषक तत्त्वे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात. …

Read More »

पोलिसांच्या मागे कोरोना

दोन अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त; सात रुग्णांची भर कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्याच्या सर्व भागांत कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोठडीमधील आरोपीमुळे कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी, तसेच एक महसूल अधिकारी कोरोनाग्रस्त आहे. आता नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या …

Read More »

स्वदेशीचा नारा

चीनने सीमेवर केलेली आगळीक आता त्यांच्याच अंगास येऊ लागली आहे. चीनसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारताने सीमेवरील हिंसक संघर्षानंतर चिनी मालावर बहिष्कार टाकत स्वदेशीचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले पाहिजे. सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. नागरिकांनीही सरकारला साथ देत शहीद जवानांच्या …

Read More »