Breaking News

Ramprahar Team

पनवेलमध्ये सात प्राथमिक शाळा अनधिकृत

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 19 प्राथमिक शाळा शिक्षण विभागाकडून अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. या अनधिकृत शाळांची यादी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पनवेल तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. या शाळांना मान्यता नसल्याने येथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी पालकांना …

Read More »

सिडकोच्या मान्सूनपूर्व कामांची चौकशी करावी

नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी; अनियमित व निकृष्ट दर्जाची कामे असल्याचा आरोप कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीचा फायदा घेत सिडको अधिकारी व ठेकेदार यांनी साटेलोटे करत मान्सूनपूर्व कामांना थुकपट्टी लावण्याचे काम केले आहे. सिडको वसाहतीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली जावून  रहिवासींना अनेक समस्यांना सामोरे …

Read More »

निसर्ग चक्रीवादळामुळे केबल व्यावसायिकांचे नुकसान

पनवेल : बातमीदार टाळेबंदी सुसह्य करण्यात दूरचित्रवाणी अर्थात टीव्ही संच सर्वांनाच उपयोगी पडला. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने केबल सेवा कोलमडली आहे. ग्रामीण भागातील छोट्या केबलचालकांची (इनपुटर) व्यवस्था उध्वस्त झाली आहे. घरोघरी केबलद्वारे सुरू असलेल्या वाहिन्यांचे जाळे विस्कटलेले आहे. टाळेबंदीत केबल उपलब्ध झाली नाही. त्यात संसर्गाच्या भीतीने तंत्रज्ञ गावी गेल्याने मनुष्यबळाची …

Read More »

भात पेरणीची कामे पूर्णत्वास

उरण : प्रतिनिधी जून महिन्याच्या आगमनातच दोन दिवसातील निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यातील घरांची छप्परे, विद्युत पोल व रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी वृक्षे उन्मळून पडल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून, सार्‍यांचेच जनजीवन  विसखळीत केले आहे. मात्र वादळानंतर पावसाने दिलेल्या उघाडीमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी भाताच्या पेरणीची कामे पूर्णत्वास नेली आहेत. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाने उघाडी …

Read More »

किरण मढवी यांचा नेत्रदानाचा संकल्प

उरण : प्रतिनिधी जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण एकनाथ मढवी यांनी बुधवारी (दि. 10) लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे  मरनोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरुन नेत्रदान करण्याचे निर्धार केला आहे. या वेळी त्यांना प्रमाणपत्र डॉ. सचिन भुमकर, डॉ. भुपेश जैन आणि डॉ. रिटा धामणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र …

Read More »

माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनकडून मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनने सामाजिक बांधिलकी जपत 38 घरांना दोन हजार रूपयांची आर्थिक मद्त केली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाने पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील आदिवासी वाडीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान …

Read More »

लँडस्केप-रोपवाटिका व्यावसायिक उद्ध्वस्त

लॉकडाऊनसह चक्रीवादळाचा कहर; लाखोंचे नुकसान पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांहून अधिक काळ जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे रोपवाटिकेतील रोपांची विक्री होत नाही. कामाला माणसे नाहीत. हाताशी नवीन काम नाही. त्यातच पाणी नसल्यामुळे रोपे टिकविताना अनेक अडचणी येत आहेत. आता पावसाला सुरुवात झाली असताना खते आणि नवीन रोपे आणायची कुठून? …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांचा नागोठणे विभागात पाहणी दौरा

नागोठणे ः प्रतिनिधी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 10) नागोठणे विभागाला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दौर्‍याचा शुभारंभ पळस येथून केल्यावर आमदार रविशेठ पाटील यांनी नागोठणे शहराच्या विविध भागांची पाहणी केली. चिकणी तसेच वांगणी विभागातील अनेक गावांना त्यांनी भेट दिली. या दौर्‍यादरम्यान आमदार रविशेठ …

Read More »

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा

भाजप तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांची मागणी माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसून गोरगरिबांच्या घरांची पडझड होऊन बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी रायगडवासीयांवर ओढवलेल्या संकटात राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दौरे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी माणगाव तालुका भारतीय जनता पक्ष …

Read More »

कर्जत-कल्याण एसटी सेवा सुरू करावी; कामगारांची मागणी

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील लोकांचा सर्वाधिक प्रवास उपनगरीय लोकलने होतो, मात्र लोकल सेवा बंद असल्याने राज्य परिवहन मंडळाने कल्याणपर्यंत एसटीची सेवा सुरू करण्याची मागणी कामगारवर्गातून करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेली एसटी राज्य परिवहन मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एसटीची सेवा कर्जत आगारातून सुरू करण्यात आली आहे. ज्या …

Read More »