Breaking News

Ramprahar Team

पनवेल पोलिसांच्या आरोग्याची विशेष काळजी

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर गेल्या दिड महिन्यापेक्षा जास्त काळ पोलीस वर्ग 24 तास रस्त्यावर आहे. त्यांच्या आरोग्याची तसेच त्यांच्या कुटुंबियांची काळजी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार हे घेतच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांनी करून घेतली पनवेल सेक्टर 6 परिसरात औषध फवारणी

पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर सर्वत्र स्वच्छता मोहिम सुरू आहे. औषध फवारणी सुरू आहे व विशेष काळजी घेतली जात आहे. असे असतानाही नवीन पनेवल सेक्टर 6 परिसरात दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची माहिती माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने त्या परिसरात …

Read More »

‘नैना’च्या डिजिटल सभेस शेतकर्यांचा विरोध

प्रकल्प परियोजना 6च्या मंजुरीसाठी सिडकोची धडपड पनवेल : बातमीदार सिडकोच्या नैना प्रकल्पातील नगररचना परियोजना टप्पा 6 योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी सिडकोची धडपड सुरू आहे. जमीन मालकांना ही योजना समजावून सांगण्यासाठी सिडकोने डिजिटल सभा आयोजित करण्याचा निर्णयही घेतला. या निर्णयाला शेतकर्‍यांनी विरोध केला असून ही सभा बेकायदा असल्याचा आरोप शेतकर्‍यांच्या संघटनांनी केला …

Read More »

पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप

पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी कार्यरत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या आरोग्याची काळजी म्हणून क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे अधिकारी-कर्मचार्‍यांना पाच लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस वर्ग प्रत्येक वेळी लोकांपर्यंत पोहचत आहे. ते सतत जागरूक असतात. त्यांच्या आरोग्यासाठी …

Read More »

बाजारात फळांच्या मागणीत वाढ; अतिरिक्त गाड्यांना परवानगी

पनवेल ः बातमीदार उन्हाळ्यासह उपवासाच्या रमजान महिन्यात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे साहजिकच बाजारात फळांना मागणी वाढली असून निर्यातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस मरगळ आलेल्या फळ बाजारात आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. फळांची हीच मागणी लक्षात घेता बाजार समितीच्या वतीने फळांच्या अतिरिक्त गाड्यांना परवानगी देण्यास …

Read More »

पोलिसांकडून आदिवासी बांधवांना मदत

पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. ताडपट्टी मालडुंगे परिसरातील काही आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना अद्यापपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती पत्रकार संजय कदम यांनी पनवेल तालुका पोलीस …

Read More »

पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी

पनवेल ः वार्ताहर रामटेक दिपकेर पेस्ट कंट्रोल (नेरूळ) नवी मुंबई विभागाच्या माध्यमातून खांदेश्वर पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिप पेस्ट कंट्रोलकडून खांदेश्वर पोलीस ठाणे इमारतीत व पोलिसांच्या वापरात येणार्‍या वाहनांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. दीप पेस्ट कंट्रोल यांनी केलेल्या कामाबद्दल खांदेश्वर पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी त्यांचे आभार व्यक्त …

Read More »

मुंबईत कार्यरत नवी मुंबईकरांमुळे कोरोनाचा धोका

मुंबईतच वास्तव्याची तरतूद करावी; महापौर जयवंत सुतार यांची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत वास्तव्यास असणारे अनेक आरोग्य अधिकारी, नर्सेस, बँक कर्मचारी मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अशा कर्मचार्‍यांची मुंबईतील कार्यरत असलेल्या त्याच ठिकाणीच वास्तव्याची तरतूद करावी, अशी मागणी नवी …

Read More »

छात्रभारतीकडून मजुरांना मदतीचा हात

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये यासाठी छात्रभारती पुढे येऊन काम करीत आहे. मोहोपाडा (नवीन पोसरी) येथे आतापर्यंत छात्रभारतीच्या वतीने 30 कष्टकरी मजुरांना व कुटुंबीयांना 218 किलो तांदूळ, 218 किलो आटा, 90 लिटर तेल, 70 किलो डाळ, 60 …

Read More »

उरणकरांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणात जून अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे, मात्र पाऊस लांबणीवर पडल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून 3 मेच्या लॉकडाऊननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उपअभियंता रंजित …

Read More »