Breaking News

Ramprahar Team

आदिवासींना धान्य वाटप

पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे आणि खारघरच्या शाश्वत फाउंडेशनच्या वतीने नऊ आदिवासी वाड्यांवर आठ दिवस पुरेल एव्हढे धान्य वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंचे 275 किट मोठ्या गोण्या भरून आदिवासी वाडीवर नेण्यात आले. यामध्ये कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या दहा आदिवाशी वाड्यांवर सामानाचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस …

Read More »

एकवीरा देवी पालखी सोहळा

चौल-आग्राव ग्रामस्थांकडून नियमांचे पालन अलिबाग : रामप्रहर वृत्त दरवर्षी चैत्र सप्तमी या दिवशी श्री क्षेत्र कार्ला येथे एकवीरा देवी पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असतो. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अखंड परंपरेला या वर्षी मात्र खंड पडला आहे. यंदाच्या वर्षी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन …

Read More »

भाजपच्या शेखर तांडेल यांच्याकडून मदत

उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे  युवा नेते  तथा नवघरचे माजी सरपंच शेखर प्रकाश तांडेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 30)  नवघर गावाजवळील झोपडपट्टीत धान्य वाटप करण्यात आले.  या वेळी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नागरी  संवक्षण दलाचे सहायक उपनिरीक्षक एम. के. म्हात्रे यांच्या उपस्थीतीत धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. …

Read More »

पाण्याच्या टाकीत विषारी औषध मिसळले

मुरूडमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूडमधील निडी गावालगत साठवणूक केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या निडी गावालगत साठवणूक टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीतील पाणी पिण्यासाठी येथील स्थानिक …

Read More »

‘कोरोना चाचणीचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असावे’

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लॅबकडून चाचणी करून दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका  चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारणार आहे. खासगी रुग्णालयांकडून कमी दर आकारणी होत असल्याने पालिकेच्या या शुल्क आकारणीस विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईत कोरोनासाठी सध्या एकही सरकारी संस्था …

Read More »

रायगडात दोन डॉक्टरांचे राजीनामे

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार; कोरोना कक्षात लावली होती ड्यूटी अलिबाग : प्रतिनिधी एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.  डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे अशी दोघांची नावे  आहेत. त्यांनी आपले राजीनामे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. राजीनामे देण्याआधी डॉक्टर, …

Read More »

कसोटीत संयम महत्त्वाचा

हल्लीच्या धावत्या युगात सर्वांना सर्वकाही झटपट होणे अपेक्षित असते. त्याला खेळही अपवाद राहिलेले नाहीत. दर्शकांना कमी वेळेत निकाल हवा असतो. त्यामुळे लीग प्रकाराला चांगलीच पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे, पण पूर्वी कसोटी क्रिकेट लोकप्रिय होते. त्यात संयम महत्त्वाचा ठरत असे. आताही माणूस एका वेगळ्या कसोटीवर आहे ती म्हणजे जीवनाची… कोरोना …

Read More »

कळंबोली स्टील मार्केटमधील वाहनचालकांसाठी भोजन

कळंबोली : प्रतिनिधी कोरूना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने लॉकडाऊन व संपूर्ण देशभरात संचार बंद जाहीर केली आहे. या काळात नवी मुंबईमधील स्टील मार्केटच्या वाहनतळात देशभरातील विविध प्रांतातील वाहनचालक अडकलेले आहेत. त्यांना पनवेल महानगरपालिका भोजनदान समितीच्या वतीने 100 वाहनचालकांना दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे …

Read More »

गोदारा रोडवेज, हरियाना वेल्फेअर असोसिएशनतर्फे अन्नदान

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्‍यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करण्यासाठी गोदारा रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड व हरियाना वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने शनिवारी (दि. 28) अन्नदान करण्यात आले. सुमारे 150 गरिबांनी या अन्नाचा …

Read More »

आदिवासींच्या मदतीसाठी शाश्वत फाऊंडेशन सरसावले

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला, तसेच संचारबंदीही लागू झाली आहे. त्याचा डोंगर, दर्‍याखोर्‍यात राहणार्‍या आदिवासी समाजावर विपरित परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर युसूफ मेहेरअली सेंटरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या मदतीच्या आवाहनाला …

Read More »