Breaking News

Ramprahar Team

टपाल, सफाई कामगारांची तपासणी करण्याची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी नवी मुंबई विभागात टपाल कर्मचारी (पोस्टमन) व महानगरपालिकेत हजारो सफाई कामगार आहेत त्यांचा थेट जनतेशी संबंध येतो. त्यांच्यापासून कोरोनाची लागण रोखण्यासाठी, कोरोनाला प्रतिबंध म्हणून त्यांची आरोग्य विभागामार्फत  तातडीने कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी विविध टपाल संघटनांकडून केली जात आहे. भारत सरकारच्या टपाल विभागाची 134 कार्यालये आहेत. …

Read More »

ग्रामीण भागातही कोरोनाबाबत जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस प्रशासनाने संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागदेखील दक्ष झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजनांचा भडीमार सुरु असताना त्याचाच एक भाग म्हणून पनवेल शहर …

Read More »

मोहोपाड्यात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा शहराची बाजारपेठ सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सुरू आहे. या वेळी आसपासच्या परिसरातील नागरिक जीवनावश्यक वस्तू मिळतील म्हणून यासाठी गर्दी करीत आहेत. यातच काही भाजीपाला, किराणा दुकानदार  चढ्या भावाने वस्तू विकत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून …

Read More »

उरणकरांमध्ये कोरोनाबरोबरच बिबट्याची दहशत

नागाव परिसरात मुक्त संचारामुळे भीतीचे वातावरण; शेतातील मळ्यात आढळले पायांचे ठसे उरण : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूची दहशत असतानाच बिबट्यानेही दहशत निर्माण केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उरणच्या नेव्हल परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असताना शुक्रवारी रात्री उरण नागाव मांडलआली येथील शेतातील मळ्यात बिबट्याच्या पायांचे ठसे सापडले आहेत. यापूर्वी उरण मोरा …

Read More »

अवैधरीत्या दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी रायगड यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपींवर शुक्रवारी (दि. 27) माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्यामसुंदर …

Read More »

गोरोबा काका मित्र मंडळाकडून अल्पोपहार

नागोठणे : प्रतिनिधी आज संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या महामारीतही आपले कर्तव्य बजावणारे नागोठणे पोलीस, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी तसेच गोरगरिबांना कुंभारआळीतील तरुणांनी स्थापन केलेल्या संत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळाकडून शनिवारी (दि. 28) सकाळी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य मोहन नागोठणेकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष रूपेश …

Read More »

माणगावात नगरपंचायतीकडून स्वच्छतेवर भर

माणगाव ः प्रतिनिधी सरकार कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. त्या अनुषंगाने माणगाव नगर पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या विषाणूची बाधा कोणाला होऊ नये यासाठी स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. नगर पंचायतीने नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी शुक्रवारपासून (दि. 27) नगर पंचायत हद्दीत सर्व भागात निर्जंतुकीकरण औषध …

Read More »

सॅनिटायझर, हॅण्डवॉशसाठी निवेदन

पाली ः प्रतिनिधी कोरोनाचा धोका सतत वाढतच चालला आहे. त्यामुळे चिंचोटी ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या चिंचोटी, दिविपारंगी, फणसापूर, बापळे गावांतील प्रत्येक घरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा पुरवठा तत्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निवेदन सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश पाटील यांनी चिंचोटी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक धुमाळ यांच्याकडे दिले. या वेळी प्रमोद वाजंत्री, बाळकृष्ण पाटील …

Read More »

कर्जत नगरपरिषदेची निर्जंतुकीकरण मोहीम

कर्जत ः प्रतिनिधी कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कर्जत शहरात सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्जत नगर परिषद क्षेत्रात अग्निशमन दलाच्या गाडीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या आदेशानुसार तसेच यांच्या देखरेखीखाली नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातून …

Read More »

मुरूड नगर परिषदेकडून जंतुनाशक फवारणी

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड नगर परिषदेकडून संपूर्ण मुरूड शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. अग्निशमन गाडीच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे व घाणीच्या सर्व ठिकाणांवर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. नगराध्यक्ष स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडित, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर व सर्व नगरसेवकांच्या मागणीनुसार सदरची फवारणी मुरूड शहरात सुरू …

Read More »