Breaking News

Ramprahar Team

कुजलेल्या कांद्याची विल्हेवाट लावण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी दिघोडे-वेश्वी गावाच्या हद्दीत असणार्‍या सिंघानिया गोदामात असलेला कांदा पूर्णपणे सडला आहे. या सडलेल्या व कुजलेल्या कांद्यात पडलेल्या किड्यांमुळे व त्यामुळे येणार्‍या भयानक दुर्गंधीमुळे वेश्वी, दिघोडे, आदिवासीवाडी व आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Read More »

नेरळमध्ये पोलिसांनी केली गाण्यातून जनजागृती

कर्जत : बातमीदार नेरळ पोलिसांनी मैदानातील बाजार भरण्याची युक्ती सफल झाली असून आता नेरळ पोलिसांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यासाठी गाणी रचली आहेत. पोलीस ठाणे हद्दीत चौकाचौकात जाऊन पोलीस ती गाणी मोठ्या आवाजात लोकांना ऐकवत आहेत, त्याचवेळी पोलीस आता बाजारपेठ भागात असलेल्या मेडिकल स्टोरमध्ये देखील सोशल डिस्टन्स राहावा यासाठी स्वतःहून …

Read More »

‘त्या’ 25 जणांना पोलिसांनी अडवले

लहान मुलांसह पायी कापणार होते 571 किलोमीटरचा रस्ता; पोलिसांकडून धान्याचे वाटप कर्जत : बातमीदार अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातून आलेले कामगार कर्जत तालुक्यात काही कामधंदा नाही म्हणून पुन्हा घरी जायला निघाले होते. नेरळ येथून दुपारी अकोला असा 571 किलोमीटर प्रवास पायी करणार्‍या 25 जणांना नेरळ पोलिसांना अडवले आणि त्यांची राहण्याची …

Read More »

मोहोपाडा परिसरात औषध फवारणी

मोहोपाडा : प्रतिनिधी तुम्हीच तुमचे रक्षक या शासनाच्या घोषवाक्यानुसार वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे. परिसरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत पुढे सरसावली असून ग्रामपंचायत सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड तसेच सर्व …

Read More »

गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे उरणमध्ये गोरगरिबांना मदत

उरण : वार्ताहर उरण शहरातील गणपती चौक येथील असलेले गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने गरजू व गरीब लोकांना शनिवारी  (दि. 28) धान्य वाटप करण्यात आले. हे वाटप ओएनजीसी, सीआयएफएस कॉलनी, उरण-पनवेल रोड समोरील झोपडपट्टी नवघर गावाजवळील झोपडपट्टी येथे प्रत्येकी तीन किलो तांदुळ व एक किलो डाळ देण्यात आली. सुमारे 450 …

Read More »

लग्नसराईचे नियोजन बिघडले

उरण : रामप्रहर वृत्त मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वच ठिकाणी लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुडा यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जास्त लोकांना एकत्रित जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोना …

Read More »

करंजाडेमध्ये भुकेल्यांना भोजन

पनवेल : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली संचारबंदी लक्षात घेता सर्वसामान्य गरीब कुटुंबांना, रोजगार करून पोट भरणार्‍या मजुरांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून शनिवारी (दि. 28) पनवेल शहर अंतर्गत असलेल्या पोलीस चौकीच्या  पोलीस अधिकार्‍यांनी धान्यवाटप तर करंजाडे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक मंडळाकडून अन्नवाटप केले. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी …

Read More »

टपाल, सफाई कामगारांची तपासणी करण्याची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी नवी मुंबई विभागात टपाल कर्मचारी (पोस्टमन) व महानगरपालिकेत हजारो सफाई कामगार आहेत त्यांचा थेट जनतेशी संबंध येतो. त्यांच्यापासून कोरोनाची लागण रोखण्यासाठी, कोरोनाला प्रतिबंध म्हणून त्यांची आरोग्य विभागामार्फत  तातडीने कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी विविध टपाल संघटनांकडून केली जात आहे. भारत सरकारच्या टपाल विभागाची 134 कार्यालये आहेत. …

Read More »

ग्रामीण भागातही कोरोनाबाबत जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस प्रशासनाने संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागदेखील दक्ष झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजनांचा भडीमार सुरु असताना त्याचाच एक भाग म्हणून पनवेल शहर …

Read More »

मोहोपाड्यात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा शहराची बाजारपेठ सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सुरू आहे. या वेळी आसपासच्या परिसरातील नागरिक जीवनावश्यक वस्तू मिळतील म्हणून यासाठी गर्दी करीत आहेत. यातच काही भाजीपाला, किराणा दुकानदार  चढ्या भावाने वस्तू विकत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून …

Read More »