Breaking News

Ramprahar Team

नवी मुंबई विमानतळासाठी ‘एसबीआय’कडून वित्तपुरवठा

पनवेल : बातमीदार नवी मुंबई विमानतळ प्रकल्प उभारणार्‍या जीव्हीके पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रा कंपनीला 16 हजार कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यास एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पातील धावपट्टी व टर्मिनल्स एल अ‍ॅण्ड टी कंपनी करणार असल्याने सर्व सोपस्कर पूर्ण होईपर्यंत सहा …

Read More »

‘ते’ फलक सुधारले

पनवेल भाजप युवा मोर्चाची तत्परता पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल ते पनवेल शहराला जोडण्याकरिता पोदी येथे नव्याने भुयारी मार्ग सुरु करण्यात आला आहे. परंतु मार्गावर जुना पनवेल हे नामफलक लावण्यात आले असून, भारतीय जनता पार्टी युवामोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 1) याचा निषेध करीत पनवेल असा उल्लेख असलेले नामफलक लावले. …

Read More »

हरवलेला आठवडा

मुंबईतील रस्ते म्हणजे खड्डेच खड्डे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्याची बुद्धी ना प्रशासनाने कधी दाखवली, ना या शहराच्या राज्यकर्त्यांनी. गेली जवळपास चार दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील या पक्षाला आपल्या महानगरातील रस्ते सुधारावेत असे कधी वाटले नाही. …

Read More »

धाटावमध्ये कृषी विभागाचा कला-क्रीडा महोत्सव उत्साहात

रोहे ः प्रतिनिधी राजीव गांधी क्रीडा स्पर्धा अभियानअंतर्गत रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकताच रोहा तालुक्यातील धाटाव येथील तालुका क्रीडा संकुलात कला व क्रीडा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. त्यात कृषी विभागाचे रायगड जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माणगाव उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव यांच्या …

Read More »

पेणमध्ये आदिवासींच्या जमिनीतून मातीचोरी

गरिबांना आमिष दाखवून होतेय फसवणूक पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हमरापूर फाट्यावरील शितोळे आदिवासीवाडी आहे. तेथील काही आदिवासींना वनहक्क कायद्यानुसार आरक्षित जमिनी मिळाल्या आहेत. या जमिनीतून मातीमाफीया आदिवासींनी धमकावून मातीची चोरी करत आहेत. आदिवासींंच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणार्‍यांविरूद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात सध्या मातीचोरीला उधाण …

Read More »

संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र -अतुल भारद्वाज

खोपोली : प्रतिनिधी रा. स्व. संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र आहेत. संस्कारक्षम नागरिक तयार होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना बाल शाखेवर पाठवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वृंदावन येथील भागवत कथाकार पूजनीय अतुल कृष्णाजी भारद्वाज यांनी शुक्रवारी (दि. 31) खोपोलीत केले. खोपोलीतील लोहाणा महाजन वाडी येथे जाखोटिया परिवाराच्या वतीने सात दिवसीय …

Read More »

आदिवासींचे उपोषण यशस्वी

कशेळे ग्रामीण रुग्णालयात सुविधा पुरविण्याचे आश्वासन कर्जत : बातमीदार तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा असून, त्यांची पुर्तता करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगीत करण्यात आले. शंभरच्या पुढे ओपीडीचा आकडा असलेल्या कशेळे ग्रामीण रुग्णालयात …

Read More »

कुरुंग जोडरस्ता खड्डेमय; ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग गावाला जोडणार्‍या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्जत-मुरबाड राज्य महामार्गापासून वारे-कुरुंग रस्ता जरी सुस्थितीत असला तरी कुरुंग गावात जाण्यासाठी असलेल्या जोड़ रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कुरुंग गाव हे डोंगराळ भागात असून, ताडवाडी-खांडस …

Read More »

एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक -डॉ. एस. बी. भगत

कर्जत बार्णे येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची बैठक उत्साहात कर्जत : प्रतिनिधी फायदेशीर शेतीसाठी भातानंतर भातऐवजी भात -भाजीपाला, भात-कडधान्य अशी पीक पद्धती अवलंबण्याची व त्यास कृषिपूरक उद्योगाची जोड देण्याची गरज आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यासाठी तसेच शाश्वत शेतीसाठी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी …

Read More »

जंजिरा मुक्तीसंग्रामाचा ऐतिहासिक लढा

मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात जंजिरा नवाबांची सत्ता होती. या भागाला जंजिरा संस्थान म्हणून संबोधले जायचेे. 31 जानेवारी 1948 रोजी जंजिर्‍याच्या नवाबाने भारताच्या सामिलनाम्यावर सही केल्याने हे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते. तेव्हापासून हा दिवस हा जंजिरा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी रायगड प्रेस क्लब व मुरूड …

Read More »